Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा ED ची धाड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Anil Deshmukh | १०० कोटी रुपयांच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग (Money laundering) झाल्याच्या संशयावरुन आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) (ED) आज रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या काटोलमधील घरी धाड टाकली आहे.

काही दिवसांपूर्वीच ईडीने अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अनिल देशमुख यांचा नागपूरात (Nagpur) एक बंगला आहे. तेथे अगोदर सीबीआयने (CBI) छापा घातला होता. त्यानंतर ईडीनेही छापा घातला होता. त्यानंतर आता आज ईडीचे चार अधिकारी काटोल येथे दाखल झाले. त्यांनी अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरात तपासणी सुरु केली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अगोदरच अनिल देशमुख यांच्या दोघा सहायकांना अटक केली होती. तसेच
अनिल देशमुख यांना समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, अनिल देशमुख यांनी
चौकशीला हजर राहण्याऐवजी त्याला न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच देशमुख यांच्या पत्नी आरती
देशमुख (Aarati Deshmukh) यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनीही हजर राहण्याऐवजी
आपल्या वकिलांमार्फत आवश्यक असलेली कागदपत्रे ईडीचा सादर केली आहे.

हे देखील वाचा

Mumbai Rains | मुंबईला जाताय तर अगोदर जाणून घ्या तेथील परिस्थिती; अतिवृष्टीमुळे पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प

Pune Crime | 67 बँक अकाऊंट वापरत पुण्यातील महिलेला 4 कोटींचा गंडा; दिल्लीतून दोघांना अटक, 21 मोबाईल, हार्ड डिस्क, 5 नेट डोंगल, 3 पेन ड्राईव्ह, 4 लॅपटॉप, आणि 8 Sim Card जप्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anil Deshmukh |enforcement directorate ed raids former maharashtra home minister anil deshmukhs residence in vad vihira near katol his native village in nagpur district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update