Anil Deshmukh | परमबीर सिंह यांच्या निलंबन रद्दचा आदेश बेकायदा आणि…, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai CP) परमबीर सिंह (IPS Parambir Singh) यांचे निलंबन (Suspension) रद्द करण्याबाबत कॅटने राज्य सरकारला (State Government) तीन वेळा अहवाल मागितला. मात्र, सरकारने तो न दिल्याने त्यांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारने कॅटला अहवाल का दिला नाही, असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. तसेच निलंबन रद्दचा आदेश बेकायदा आणि आरोपीला संरक्षण देणारा आहे, असे देशमुख यांनी म्हटले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी परमबीर सिंह यांचा राजकीय वापर करुन मला अडकवण्यात आले. त्यांच्या मागे अदृश्य राजकीय शक्तीचा हात असल्याचा आरोप अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला.

 

 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, परमबीर यांच्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात आठ ते दहा गंभीर गुन्हे आहेत. खंडणी (Extortion), कायद्याचा दुरुपयोग या सारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Industrialist Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानासमोरील स्फोटके प्रकरणातील परमबीर सिंह हेच मुख्य सूत्रधार आहेत.

 

गृहमंत्री असताना परमबीर यांची खालच्या पदावर बदली केली होती. तसेच या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएने (NIA) न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात परमबीर सिंग यांची मुख्य भूमिका असल्याचे नमूद केले आहे. स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील (Mansukh Hiren Murder Case) आरोपी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) याचा जामीन अर्ज फेटाळताना परमबीर सिंह यांचा मुख्य सहभाग असताना त्यांना संरक्षण का दिले, असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) ओढले होते.

Advt.

राजकीय विरोधकांनी परमबीर यांना आरोप करण्यास सांगितले आणि त्यानंतर ते सात महिने फरार झाले.
कोर्टात किंवा चांदीवाल आयोगापुढे (Chandiwal Commission) त्यांनी पुरावे सादर केले नाहीत. उलट ऐकीव माहितीवर आरोप असून
कोणतेही पुरावे नाहीत, असे शपथपत्र त्यांनी वकिलांमार्फत सादर केले होते. खोट्या आरोपावरुन मला 14 महिने तुरुंगात राहावे लागले.
राज्य सरकारने कॅटला अहवाल न देणे आणि कॅटने त्यांचे निलंबन रद्द करणे म्हणजे राज्य सरकारने
परमबीर यांना बक्षीस दिले आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर केला.

 

 

 

Web Title :  Anil Deshmukh | former home minister anil deshmukh allegations against the state government over parambir singh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा