Anil Deshmukh | सर्वोच्च न्यायालयानं अनिल देशमुखांची तपासाबाबत ‘ती’ मागणी करणारी याचिका फेटाळली; माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या खंडणीचे आरोप केले. यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात वारंवार अडचणी होताना दिसत आहे. सीबीआय (CBI) तपासाचा अहवाल तपासणीसाठी न्यायालयाच्या समोर ठेवण्याची मागणी करणारी देशमुख यांची याचिका सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) फेटाळली आहे.

 

तर, तपास यंत्रणांना त्यांनी केलेल्या चौकशीची माहिती निरीक्षणासाठी न्यायालयासमोर ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने देशमुख यांनी दाखल केलेली ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच परंतु हायकोर्टात (High Court) जाण्याची परवानगी सुप्रिम कोर्टाने देशमुख यांना दिली आहे.

बुधवारी सीबीआयने हाय कोर्टात म्हटले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला खीळ बसावी, त्यात तपास यंत्रणेला अपयश यावे, यासाठी राज्य सरकार ‘निर्लज्जपणे’ प्रयत्न करत आहे. त्यामुळे या याचिकेद्वारे दिलासा मिळविण्यास राज्य सरकार पात्र नाही. असं म्हटलं आहे. त्याचबरोबर, देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासाप्रकरणी सीबीआय (CBI) ने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) व पोलीस महासंचालक संजय पांड्ये (Sanjay Pandey DGP) यांना बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नितीन जामदार (Justice. Nitin Jamdar) व न्या. सारंग कोतवाल (Justice. Sarang Kotwal) यांच्या खंडपीठापुढे होती.

 

Web Title :- Anil Deshmukh | former home minister anil deshmukh another blow anil deshmukh supreme court rejects petition seeking inquiry

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Priyanka Chopra | प्रियंका चोप्राचा पती निक जोनसला वयाच्या 13 व्या वर्षापासून आहे ‘हा’ आजार

Shirdi Saibaba Sansthan | शिर्डी संस्थानाच्या बाबतचा ‘तो’ निर्णय लांबणीवर; मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे दिले कारण

Nawab Malik | ‘पहिल्या पत्नीच्या मामेभावाला वानखेडेंनी अडकवलं’; नवाब मलिकांचा खळबळजनक गौप्यस्फोट

PM Kisan | कोट्यावधी शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! आता ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही ‘पीएम किसान’चे पैसे, मोदी सरकारने बदलले नियम

Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ चांगल्या योजनांमध्ये गुंतवा पैसा, जाणून घ्या किती वेळात होतील दुप्पट

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट ! 18 महिन्यांपासून रखडलेल्या DA थकबाकीबाबत मोठं अपडेट आलं समोर