Anil Deshmukh | तुरूंगात असलेल्या अनिल देशमुखांना तुर्तास तरी घरचे जेवण नाहीच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटीच्या खंडणीच्या आरोपावरुन चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना अटक (Arrested) करण्यात आली. दरम्यान, देशमुख यांना सध्या विशेष पीएमएलए कोर्टाने (Special PMLA Court) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सोमवारी सुनावली आहे. यानंतर त्यांना बेड व औषधे पुरविण्याचे निर्देश दिले. मात्र, देशमुख यांना घरचे जेवण नसणार आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वय व त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता ते कारागृहात जमिनीवर झोपू शकत नाहीत. त्यांना बेड व औषधे देण्याची तसेच घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी. अशी विनंती देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम (Add. Aniket Nikam) यांनी केली. त्यावर न्यायालयाने देशमुख यांना बेड व कारागृहातील डॉक्टरांना दाखवून औषधे नेण्याची परवानगी दिली. परंतु, घरचे जेवण देण्याबाबत केलेल्या अर्जावरील सुनावणी नंतर घेण्यात येणार आहे.

देशमुख यांना कारागृहातील जेवण घेतल्याने काही समस्या उद्भवली तर त्यांनी घरच्या जेवणासाठी तातडीने अर्ज करावा, असं कोर्टानं (Court) म्हटलं आहे.
यावरुन देशमुख यांना काही काळ कारागृहातील जेवण खावे लागणार आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर रोजी चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.
त्यानंतर देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.
अखेरीस सोमवारी त्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे देखील वाचा

MHADA | म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

Chitra Wagh Letter To Ajit Pawar | राष्ट्रवादीला ‘सोडचिठ्ठी’ देऊन भाजपात गेलेल्या चित्रा वाघ यांचं अजित पवारांना पत्र, म्हणाल्या…

Hardik Pandya Watch | हार्दिक पांड्याकडून 5 कोटींची घड्याळं जप्त, मुंबई कस्टम विभागाकडून कारवाई

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anil Deshmukh | former home minister anil deshmukh jail no home cooked meals right now

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update