Anil Deshmukh | अनिल देशमुखांनी न्यायालयात केली ‘ही’ विनंती, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटीचे खंडणीचे आरोप केले. यामुळे राज्यात खळबळ उडाली. या पार्श्वभुमीवर अनिल देशमुखांची चौकशी सुरू आहे. काल (शुक्रवारी) देशमुख यांना विशेष कोर्टात (Special court) हजर केले असता देशमुख यांनी न्यायालयात विनंती केली. ‘मी गेले 10 दिवस ED कोठडीत आहेत. दर दिवशी ते मला सात ते आठ तास प्रश्न विचारतात. आता पुरे करा, अशी विनंती देशमुख यांनी केली आहे.

 

सक्तवसुली संचालनालयाचे (ED) वकील श्रीराम शिरसाट (Advocate Shriram Shirsat) यांनी कोर्टात रिमांडची कागदपत्रे देत देशमुख यांना आणखी 3 दिवस ईडी कोठडी द्यावी, अशी विनंती केली आहे. त्यावेळी देशमुख साक्षीदारांच्या पिंजऱ्यात उभे होते. त्यामुळे कोर्टाने अनिल देशमुखांना बोलण्याची संधी दिली. तर, मला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आल्याने त्यांनी ईडीला दिलेला जबाब ते मागे घेत आहेत. ‘निरर्थक प्रश्न विचारून माझी तासनतास चौकशी करण्यात येते. चुकीच्या उद्देशाने सारखे-सारखे तेच तेच प्रश्न विचारण्यात येतात. जेणेकरून माझ्याकडून दरवेळी वेगळी उत्तरे मिळावीत. प्रत्येक प्रयत्न मला गोंधळात टाकण्यासाठी व माझी विचारप्रक्रिया बिघडवण्यासाठी केला जातो. असं देशमुख यांनी न्यायालयाला पत्र लिहिले आहे.

 

‘तुम्ही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जबाब नोंदविल्यावर खासगी व्यक्तीला समन्स बजावले? कधी जबाब नोंदविला? ते येतील?’ असे प्रश्न न्यायालयाने ईडीला केले आहे. यानंतर वकिल श्रीराम शिरसाट यांनी न्यायालयाला (Special court) सांगितले की, 11 नोव्हेंबरच्या जबाबावरून खासगी व्यक्तीला समन्स बजावण्यात आले असून, ती व्यक्ती नवी मुंबईत राहते. त्यांना 13 नोव्हेंबर रोजी ED पुढे हजर राहण्यास सांगितले आहे.

 

 

 

दरम्यान, देशमुख हे प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. वाझे याची त्यात मुख्य भूमिका आहे.
पोलिसांच्या बदल्या, नियुक्त्या याबाबत त्यांचा जबाब नोंदवावा लागेल.
नागपूर येथील एका खासगी व्यक्तीने ‘प्रतिष्ठित प्रकल्प’ केले आहेत.
ती व्यक्ती देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी नियमितपणे येत असे.
त्या व्यक्तीचीही चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच काही प्रमुख साक्षीदारांना बोलावले असून त्यांना व देशमुख यांना समोरासमोर करावे लागणार आहे, असं शिरसाट म्हणाले.

 

दरम्यान, अनिल देशमुख यांचे वकिल विक्रांत चौधरी (Vikrant Chaudhary) व
अनिकेत निकम (Aniket Nikam) म्हणाले की, अनेक आजार असलेल्या 72 वर्षांच्या व्यक्तीची 13 तास चौकशी केली.
सामान्यतः ते चौकशीसाठी आलेल्या व्यक्तीला संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत बसवतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावतात.
मात्र, त्यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला 13 तास बसवून ठेवले आणि मग अटक केली.
अशा परिस्थितीत त्यांनी रिमांड अर्ज करणे कितपत योग्य आहे? असा युक्तीवाद त्यांनी केला.

 

Web Title :- Anil Deshmukh | former home minister anil deshmukh request to Special court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा