Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा धक्का ! न्यायालयाने अखेर जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. मागील दीड-दोन महिन्यापासून अनिल देशमुख अटकेत आहेत. त्यानंतर त्यांना कुठेही दिलासा मिळाल्याचे दिसत नाही. देशमुखांच्या वकिलांकडून त्यांच्या जामिनासाठी अनेक खटाटोप करण्यात आला. मात्र, देशमुखांना जामीन मिळणं अवघड झालं आहे. आज (मंगळवारी) मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai Sessions Court) अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज (Bail Application) फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुखसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) मोठा धक्का बसला आहे.

 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज फेटाळण्याबाबतचा निर्णय विशेष पीएमएलए न्यायालयाने आज दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या अनिल देशमुख हे आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Prison) न्यायालयीन कोठडीत आहेत.

 

दरम्यान, 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) अनिल देशमुख (Anil Deshmukh)
यांना 2 नोव्हेंबर रोजी ईडीकडून (ED) अटक (Arrested) करण्यात आली. बारा तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती.
यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. सध्या देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत.
आजच्या झालेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीवर त्यांना अखेर दिलासा मिळाला नसल्याने परत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Anil Deshmukh | mumbai sessions court rejects former home minister anil deshmukh bail plea

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Online Correction In Aadhaar Card | ‘आधार कार्ड’मध्ये ऑनलाइन सुधारणा करण्यासाठी लागतात ‘ही’ 32 कागदपत्रे, पहा – संपूर्ण यादी

 

Post Office Small Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून बनवू शकता 35 लाखापर्यंतची रक्कम, ही आहे पद्धत

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा मेट्रो प्रशासनाला सवाल; म्हणाले – ‘पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?’

 

Numerology | अंकराशी 19 जानेवारी ! ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना दिवसभरात मिळतील अनेक संधी, विनकारण खर्च होईल पैसा