Anil Deshmukh | राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना मोठा दिलासा, तब्बल 11 महिन्यानंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलासा दिला असून त्यांना जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) याने केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपाखाली, तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर ईडी ED) आणि सीबीआयने (CBI) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली होती. त्यानंतर सातत्याने त्यांचा जामीनाचा अर्ज फेटाळला जात होता. आता तब्बल 11 महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जामीन मिळाला तरी लगेच बाहेर नाही

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये हा जामीन मिळाला असून अद्याप सीबीआयकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आता सीबीआयकडूनही त्यांना जामीन मिळणार का हे पाहावं लागेल. त्यामुळे देशमुख यांची लगेचच तुरुंगातून सुटका होणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यांना सध्यातरी आर्थर रोड तुरुंगातच (Arthur Road Jail) राहावं लागेल.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai CP Parambir Singh) यांच्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुख यांना ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. पीएमएलए न्यायालयानं (PMLA Court) 18 मार्च रोजी देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. प्रकृतीचे कारण तसेच वाढतं वय पाहता आपल्याला जामीन देण्याची विनंती त्यांनी केली होती. अनिल देशमुख हे सध्या 73 वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळलेला आहे, त्यासोबतच उच्च रक्तदाब आणि विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. तसेच त्यांना कोरोना होऊन गेला आहे. या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्याने त्यांना सतत आधार आणि दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे मानवतेच्या भावनेनं जामिनावर सोडण्याची विनंती देशमुख यांनी हायकोर्टात केली होती.

दरम्यान, देशमुख यांचा जामीन अर्ज जवळपास सात महिन्यांपासून प्रलंबित राहिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने
(Supreme Court) सोमवारी नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाला लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करुन निर्णय देण्याचे निर्देश दिले होते.

Web Title :- Anil Deshmukh | ncp leader and ex home minister anil deshmukh finally granted bail by mumbai high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Udayanraje Bhosale | तुम्ही म्हणता आम्ही केले मग दाखवा काय केले, उदयनराजेंचा आमदार शिवेंद्रराजेंवर पलटवार

Amruta Fadnavis | CM शिंदे धमकी प्रकरणाच्या टीकेला अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर; यशोमती ठाकूरांना म्हणाल्या – वेगळा दिमाख असणार्‍या…