Homeताज्या बातम्याAnil Deshmukh | अनिल देशमुख प्रकरणी खा. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या -...

Anil Deshmukh | अनिल देशमुख प्रकरणी खा. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘पवार साहेबांनाही ED ची नोटीस बजावली, पण…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील घरावर शुक्रवारी (दि. 25) सकाळी ईडीने (ED) छापे टाकले आहेत. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (NCP leader Supriya Sule) यांनी भाजपला (BJP) लक्ष्य केले आहे. पवार साहेबांनाही ईडीची (ED) नोटीस आली होती. पवार साहेबांनी वैचारिक राजकराण केलं पण कधीही सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना त्रास दिला नाही. यासाठी कोणत्याही तपास यंत्रणेची मदत घेतली नाही. पण देशमुखांच्या बाबतीतही हेच झालं आहे. हे जाणूनबुजून केल जात आहे. पण ठीक आहे हम लढेंगे, असे सुळे यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात कोरोना, आरोग्य व्यवस्था आणि बेरोजगारी अशी संकट असताना विरोधकांकडून असे प्रकार करणे दूर्दैवी असल्याचेही खासदार सुळे म्हणाल्या. Anil Deshmukh | ncp leader and mp supriya sule first reaction to anil deshmukh ed raid serious allegations against bjp

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्या. त्यावेळी देशमुखांच्या ईडी (ED) छाप्याविषयी विचारले असताविरोधी पक्षाकडून हे जाणूनबुजून केले जात आहे. मी आतापर्यंत विचारांचे राजकारण (Politics) पाहिले आहे. विरोधकांच्या विरोधात राजकारण करण्यासाठी एजन्सीचा गैरवापर होत असल्याचे मी कधीही पाहिल नसल्याचे त्या म्हणाल्या. राज्यात सध्या कोरोनाचा धोका वाढत आहे. या भीषण जीवघेण्या संसर्गामुळे अनेक समस्या समोर आहेत. अशात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही सगळे मंत्री, नेते, अधिकारी, आमदार, खासदार याच कामात व्यस्त आहोत. विरोधकांप्रमाणे सुडाचे राजकारण करण्यासाठी आम्हाला वेळ नाही, असा खोचक टोलाही खासदार सुळे यांनी लगावला आहे.

Web Title :- Anil Deshmukh | ncp leader and mp supriya sule first reaction to anil deshmukh ed raid serious allegations against bjp

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News