Anil Deshmukh | सचिन वाझे आणि अनिल देशमुखांची फक्त एकदाच भेट; वकिलाचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पोलीस दलातून बरखास्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) या प्रकरणात न्या. चांदीवाल समितीसमोर अनेक बाबी समोर आल्या आहेत. सचिन वाझेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याची कबुली दिली आहे. तर 4.70 कोटींबाबत कोणताही उल्लेख नसल्याचा दावा अनिल देशमुख यांचे वकील कमलेश धुमरे (Kamlesh Dhumre) यांनी केलाय. त्यावेळी ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.

ॲड. कमलेश धुमरे (Kamlesh Dhumre) बोलताना सांगितले की, सक्तवसुली संचालनालय (ED) आणि CBI ज्यावेळी जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असतो. परंतु, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तर ED च्या चौकशीत सचिन वाझेने (Sachin Vaze) बार मालकांकडून ‘नंबर वन’ व्यक्ती म्हणजे अनिल देशमुख असं म्हटलं आहे. मात्र, त्याला आक्षेप घेत ॲड. धुमरे यांनी याबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा केला आहे. ED ने तपासाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तसेच पुढे ते म्हणाले, ‘आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे (Sachin Vaze) याने पैसे दिले असे सांगत नाही.

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

त्याचा ED घेत असलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो.
CRPC मध्ये पोलिसांसमोर दिलेला जबाब स्वीकारला जात नाही. 100 कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे.
बारची संख्याही विसंगत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

या दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ED) अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख (Aarti Deshmukh) यांना बुधवारी समन्स दिले आहे. त्या 66 वर्षांच्या आहेत.
त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत.
त्या गृहिणी आहेत, त्यांचा या व्यवहाराशी काही देखील संबंध नसल्याचे देखील ॲड. कमलेश धुमरे (Kamlesh Dhumre) यांनी म्हटले आहे.

Web Title :  anil deshmukh | only one visit waze and deshmukh anil deshmukhs lawyer claims

हे देखील वाचा

Pimpri News | 62 वर्षाच्या वृद्धाला ब्लॅकमेल करुन 18 लाखांना लुबाडले;
किवळेतील 34 वर्षाच्या महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल

Pimpri Crime | वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍याच्या अंगावर सोडले कुत्रे

Obesity | विवाहानंतर 80 % स्त्रिया लठ्ठ का होतात?
5 कारणे ऐकल्यास तुम्ही देखील म्हणाल हे सत्य आहे, जाणून घ्या