Anil Deshmukh | अनिल देशमुखांना क्लिन चिट? चांदीवाल आयोगाचा अहवाल CM उद्धव ठाकरेंकडे सादर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai CP) परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींचा आरोप केला होता. अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्यानंतर देशमुख यांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोग (Justice Chandiwal Commission) स्थापन करण्यात आले. दरम्यान आता आयोगाने आपला 201 पानांचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे आज (मंगळवारी) सादर केला आहे. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) उपस्थित होते.
Chandiwal Commission submits its report to Maharashtra CM. It was initially submitted before Home Dept & was handed over to CM today.
The Commission was constituted by State Govt to probe ex-Mumbai Police Commissioner PB Singh’s allegations of corruption against Anil Deshmukh.
— ANI (@ANI) April 26, 2022
अनिल देशमुखांवरील (Anil Deshmukh) आरोपांची चौकशी करण्यासाठी 31 मार्च 2021 रोजी न्या. चांदीवाल यांच्या एकसदस्यीय आयोगाची स्थापना राज्य सरकारने (Maharashtra State Government) केली होती आणि 31 डिसेंबर 2021 पर्यंत आयोगास अहवाल देण्यास सांगितले होते. पण आयोगाने त्यापूर्वीच 3 महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाला 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आयोगाने पुन्हा केलेल्या विनंतीनुसार 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. आयोगाचा अहवाल विधिमंडळाच्या जुलैमध्ये होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनात सरकारतर्फे सादर होण्याची शक्यता आहे.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना 20 मार्च 2019 रोजी एक खळबळजनक पत्र पाठवले होते. त्या पत्रामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारमधून 100 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यास पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना सांगितले होते. असा आरोप केला होता. या पत्रातील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. चांदीवाल यांचा एक सदस्य आयोग नेमला होता. त्याचा अहवाल आज मुख्यमंत्र्याकडे सादर करण्यात आला आहे.
Web Title :- Anil Deshmukh | report of chandiwal commission investigating allegations against anil deshmukh submitted to chief minister uddhav thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- MPSC तर्फे राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला गती; स्पर्धा परीक्षेच्या 15 हजार जागा भरणार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
- Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
- Health Alert | पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा वापर अतिशय धोकादायक, कॅन्सरसह अनेक आजार होण्याची शक्यता; जाणून घ्या