Anil Deshmukh-Sachin Vaze | सेवेत कायम करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितले होते 2 कोटी; ED ला दिलेल्या जबाबात सचिन वाझेचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh-Sachin Vaze | पुन्हा सेवेत घेण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सूचनेनुसार तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना एप्रिल 2020 मध्ये विनंती अर्ज पाठविला होता. त्यानंतर सेवेत सामावून घेण्यात आले पण काही मंत्र्यांनी सेवेतून बाहेर काढण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केल्याचे समजले. त्यातच देशमुख यांनी सेवेत कायम करण्यासाठी 2 कोटी मागितल्याचा दावा निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याने ईडीला (ED) दिलेल्या जबाबात केला आहे. (Anil Deshmukh-Sachin Vaze)

 

वांद्रे येथे एन 95 या प्रतिबंधित मास्कचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. निलंबित असतानाही या कारवाईत आपली भूमिका महत्त्वाची होती असा दावाही वाझेने केला आहे. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ती माहिती दिली. निलंबित असतानाही केलेल्या कामगिरीमुळे अनिल देशमुख माझ्यावर खुश होते. त्यांनी निलंबन रद्द करण्यात येईल त्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना विनंती अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार मी विनंती अर्ज केला. त्यांनी दिलेल्या सूचनेचे मी पालन केले आणि ते रेकॉर्डवर आहे, असे वाझे यांनी ईडीला 11 डिसेंबर रोजी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. गत महिन्यात ईडीने देशमुख आणि अन्य काही जणांवर दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रास वाझे यांचा जबाब जोडण्यात आला आहे. त्यात वाझे यांनी 7 एप्रिल 2020 ला विनंती पत्र परमबीर सिंह यांना पाठवल्याचा उल्लेख आहे. (Anil Deshmukh-Sachin Vaze)

 

घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनूस (Accused Khwaja Yunus) याचा कोठडीत मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात 2004 मध्ये सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 5 जून 2020 म्हणजे 16 वर्षानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील आढावा समितीने त्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, सेवेत रुजू झाल्यानंतर काही ज्येष्ठ नेत्यांचा मला सेवेत घेण्यास विरोध असल्याचे समजले.
माझ्या निलंबनासाठी ते परमबीर सिंह यांच्यावर दबाव आणत असल्याचेही मला कळले होते.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशमुख यांचा मला कॉल आला आणि मला सेवेत कायम ठेवण्यासाठी त्यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितली, असाही दावा वाझेने केला.

 

सिंह यांचाही जबाब जाेडला –
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात परमबीर सिंह यांचाही जबाब जोडण्यात आला आहे.
परमबीर सिंह यांनी दिलेल्या जबाबात असे म्हंटले आहे की, वाझेला सेवेत घेण्यासाठी देशमुख यांनी दबाव आणला होता.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडून तशा थेट सूचना होत्या.

 

Web Title :-  Anil Deshmukh-Sachin Vaze | letter to the commissioner for resumption of service on the suggestion of deshmukh says sachin vaze

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा