स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआरवर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्याऱ्यांना अटक, गृहमंत्र्यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कॉमेडियन अग्रिमा जोशुआ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, समाजिक माध्यमांवर त्यांना टार्गेट केल्याचे दिसून आले. त्यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर करत धमकी देणाऱ्या उमेद दादा उर्फ इम्पतियाज शेख याला नालासोपारा येथून सोमवारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात यापूर्वी शेखचा साथिदार शुभम मिश्राला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे.

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. तिच्यावर कारवाई करण्याची मागणी होत असतानाच काही जणांनी सोशल मीडियावरून जोशुआवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. अग्रिमा जोशुआनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकावरून विनोदी वक्तव्य केलं होतं. यानंतर तिच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रिमा जोशुआ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात कारवाई करण्यापूर्वी स्थायी समितीचा कायदेशीर सल्ला घेण्यात येईल. त्याचबरोबर एका महिलेवर आक्षेपार्ह टीका टिप्पणी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. उमेश जाधव उर्फ इम्तियाज शेख याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी आक्षेपार्ह टीका व पोस्ट करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी अशा सर्वांची यादी तयार केली असून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like