Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या मुलाला सशर्त जामीन मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पैशांची अफरातफर आणि खंडणी या आरोपांत अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मुलाला सशर्त जामीन मिळाला आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीनावरील याचिका अद्याप प्रलंबित आहे.

 

विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयाने अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख (Saleel Deshmukh) यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. 3 लाख रुपयांच्या जामीन जातमुचलक्यासह काही अटींवर सलील देशमुख यांना जामीन देण्यात आला आहे. सलील देशमुख परवागीशिवाय देश सोडून जाऊ शकत नाहीत. सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) त्यांच्या विरोधात न्यायलयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर पैशांची अफरातफर प्रकरणात फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांना समन्स बजाविण्यात आले होते. मंगळवारी न्यायालयात त्यांच्या वकिलांनी जामीन मंजूर करण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

 

ईडीने अनेकवेळा त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊनही ते न्यायालयात हजर राहिले नाहीत,
असे ईडीने यावेळी न्यायालयात सांगितले. पण ईडीने त्यांना अटक केलेली नव्हती.
पैशांची अफरातफर प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh)
यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्यरो (CBI) करत आहे.

 

अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांच्या विरोधात भाजपने आवाज उठवला होता.
त्यानंतर हा कथित प्रकार समोर आला होता. या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा देखील समावेश होता.

 

Web Title :- Anil Deshmukh | special pmla court grants bail to maharashtra former home minister anil deshmukh son salil deshmukh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrapur ACB Trap | 2 लाखाची लाच घेताना सार्वजनिक बंधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Arvind Sawant | मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देखील चौकशी झाली पाहिजे – अरविंद सावंत

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे मिशन 40! शिंदे गटाच्या आमदारांना शह देण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात