Anil Deshmukh | अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मुंबई हायकोर्टाला दिले आदेश, म्हटले – तातडीने सुनावणी घेत निर्णय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज दीर्घकाळ प्रलंबित याचिकेची दखल घेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना दिलासा दिला आहे. देशमुख सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) कारागृहात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला (Bombay High Court) देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड (Justice D. Y. Chandrachud) आणि हिमा कोहली (Justice Hima Kohli) यांच्या खंडपीठाने 21 मार्चपासून अनिल देशमुख यांची जामीन याचिका (Bail Petition) प्रलंबित असल्याची नोंद घेतली.

 

खंडपीठाने सुनावणीत म्हटले की, जामीन अर्ज दाखल करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला आपली याचिका लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल अशी कायदेशीर अपेक्षा असते. जामीन याचिका प्रलंबित ठेवणे कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत नाही.

 

खंडपीठाने स्पष्ट केले की, आम्ही एक निर्देश जारी करत असून याचिकाकर्त्याला ज्या न्यायमूर्तींकडे खटला सोपवण्यात आला आहे त्यांच्यासमोर अर्ज करण्याची परवानगी देतो. हा अर्ज याच आठवड्यात सुनावणीसाठी घेतला जाईल आणि त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल. (Anil Deshmukh)

 

या प्रकरणावर न्यायालयाने इतर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
मुंबई उच्च न्यायालयात एन. जे. जामदार (N. J. Jamdar) यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.
सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) असलेल्या अनिल देशमुखांना नोव्हेंबर 2021 मध्ये सक्तवसुली ईडीने (ED) केली आहे.

 

Web Title :- Anil Deshmukh | supreme court on anil deshmukh bail application plea pending in supreme court money laundering case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | किरकोळ वादातून रिक्षा चालक तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

Popular Front of India (PFI) | PFI च्या रडारवर कोण कोण होतं? महाराष्ट्र ATS कडून खुलासा