Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठ्ठा धक्का ! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लॉड्रिंग (Money laundering) तसेच 100 कोटींच्या वसुली प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अनेकदा नोटीस बजावली आहे. मात्र, नोटीस बजावूनही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी काही कारणे देत प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर ईडीने कारवाई करु नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. त्यांनी याचिकेच्या माध्यमातून काही मागण्या केल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने अनिल देशमुख यांना दणका बसला आहे.

सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर (Justice A.M. Khanvilkar), न्यायमूर्ती कृष्णा मुरारी (Justice Krishna Murari) आणि न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यम (Justice V Ramasubramaniam) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.
ज्येष्ठ विधीज्ज्ञ विक्रम चौधरी (Senior lawyer Vikram Chaudhary) यांनी अनिल देशमुख यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली.

अनिल देशमुखांनी केल्या होत्या या मागण्या

अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत प्रामुख्याने तपासाला स्थगिती द्यावी, ईडीकडून पाठवण्यात आलेले समन्स रद्द करावे, अटकेसारखी गंभीर कारवाई करण्यास मज्जाव करावी, अशा मागण्या होत्या.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या मागण्या करणारी याचिका फेटाळून लावली.
याबाबत सीआरपीसीच्या अनुषंगाने याचिका करावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.

 

Web Title : Anil Deshmukh | supreme court refuse interim protection anil deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Driving License साठी ‘या’ 5 राज्यात आता 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाही, जाणून घ्या

Afghanistan Crisis | अफगाणिस्तान सोडण्याची घाई पडली महागात, उडणार्‍या विमानातून पडले तीन लोक, टायर पकडून लटकले होते (व्हिडीओ)

Sharad Pawar | शरद पवार यांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला