100 कोटी वसुली प्रकरणी CBI कडून FIR दाखल होण्याची शक्यता; ठाकरे सरकारसह माजी गृहमंत्री देशमुख यांच्या अडचणी वाढणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी खंडणीच्या आरोपावरून राज्यात एकाच खळबळ उडाली. यानंतर हाय कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने देशमुख यांचा तपास करत आहेत. अखेरच्या तपासात देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते. ठाकरे सरकारसह देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

अधिक माहिती अशी, CBI पथकाने अनिल देशमुख यांच्यासह एकूण ७ जणांचे जबाब नोंदवले आहे. या जबाबातून अनेक धक्कादायक स्पष्ट समोर आले असून., या स्पष्टीकरणाची शहानिशा तसेच वस्तूजन्य परिस्थितीजन्य तांत्रिक असे विविध पुरावे गोळा करून लवकरच १०० कोटी भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करू, असे CBI च्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. तर १०० भ्रष्टाचार प्रकरणी CBI ने अनेकांचे जबाब नोंदून घेतले आहे. त्यातील काही व्यक्तींनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे, तर त्या माहितीची पडताळणी करण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले. अनेकांनी केलेले दावे आणि साक्षीदाराने केलेले दावेही तपासले जाणार आहे. तर यामध्ये काही निष्पन्न झाले तर अटक होण्याची शक्य वर्तवली आहे. असे CBI ने सांगितले आहे.

आज झालेल्या CBI प्राथमिक चौकशी अहवाल कोर्टात सादर करणार होते. परंतु अशा मिळत असलेल्या माहितीमुळे, मुंबई हाय कोर्टाने पहिल्या सुनावणीदरम्यान CBI तपास यंत्रणेला स्पष्ट केलं आहे की, या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल करू शकता आणि कारवाईदेखील करू शकता तसंच जर तुम्हाला त्या प्रकरणात काही तथ्य वाटत नसेल तर तसा क्लोजर अहवाल कोर्टात द्यावा असे देखील म्हटले गेले आहे. यादरम्यान, CBI करत असलेल्या तपासावर याचिकाकर्ते जर समाधानी नसतील तर तशी माहिती त्यांनी कोर्टाला द्यावी. त्यानुसार, कोर्टात CBI या तपास यंत्रणेला त्याबद्दल जाब विचारणार असे आदेश कोर्टाने दिले होते. त्याच अनुषंगाने आता CBI प्राथमिक चौकशी अहवाल तयार करत असून लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, तसेच, नेमका गुन्हा कोणाच्या विरोधात दाखल होतो आणि कोणाच्या अडचणींमध्ये वाढ होते हे CBIने गुन्हा दाखल केल्यानंतरच स्पष्ट होईल. असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.