राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अनिल गोटेंनी भाजपवर अत्यंत खालच्या थरावर जाऊन केली टीका, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे कमळ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घालणाऱ्या माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करुन तोंडसुख घेतले. अनिल गोटेंनी फेसबुकवर अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत पोस्ट केली आहे.

अनिल गोटे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले की, “देवेंद्रजींच्या वर्षा नाईट क्लबचे सदस्य, भाजपने मला तिकीट दिले नाही, या रागापोटी मी लिहित असल्याचा जावई शोध चाटू लोकांनी लावला आहे. अपमान अथवा अवहेलना सहन करुन भाजपमध्ये राहणारा लाचार मी नाही. मी अहिल्यापूत्र आहे. माझ्या आत्मसन्माला धक्का लागल्या बरोबर मी बाहेर पडलो. आत्मसन्मानाची किंमत लाचारांना कळणार तरी कशी? माझ्या भानगडीत कुणी स्त्री लंपट रामाने कदम टाकू नये. मला संघ जनसंघ निष्ठा वगैरे शिकविण्याच्या नादात पडू नये. देवेंद्रजी आपण पाळलेल्या पाळीव प्राण्यांना वेळीच लगाम घाला. माझ्याकडे गमवण्यासाठी प्राणाशिवाय काही नाही. दिलदार के लिए दिलदार है हम! दुष्मन के लिए तलवार है हम!’, असा इशारा अनिल गोटे यांनी दिला आहे.”

https://www.facebook.com/anil.gote.79/posts/2761452570610643

अनिल गोटे यांनी नुकतीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या 80 व्या वाढदिवशी अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. दरम्यान धुळे महापालिका निवडणूकीदरम्यान अनिल गोटे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून अनिल गोटे भाजप विरोधी भूमिका घेताना दिसले.

तेलगीचा मित्र
तेलगीचा मित्र अशी एकेकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनिल गोटेंचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर शरद पवार आणि अनिल गोटे यांच्यात झालेले वाद काही लपून नाही. परंतू हा वाद मिटवत अनिल गोटे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like