Anil Gote On Devendra Fadnavis | अनिल गोटेंचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र; लिहीलं – ‘देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नातही विश्वास ठेवू नका’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  Anil Gote On Devendra Fadnavis | धुळे शहराचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी एक खरमरीत पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सर्व बंडखोर आमदारांना लिहिले आहे (Anil Gote On Devendra Fadnavis). यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका, असा वडीलकीचा सल्ला दिला आहे.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका, असे म्हणत अनिल गोटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहाल शब्दांत टीका केली आहे. गोटे यांनी पत्रात लिहिले आहे की, मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल यापूर्वीच आपले हृदयापासून अभिनंदन केले. मोगॅम्बो खुश हुआ. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत म्हणून वडीलकीचा सल्ला देतो. मानला तर फायदाच होईल. किमान फसवणूक व नंतर पश्चाताप होणार नाही, ही एक लाख टक्के खात्री देतो. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका.

 

या पत्रातून गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत शिंदे गटाला सल्ला दिला आहे
की, देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासारख्या धनगर समाजातील कार्यकर्त्याचा छळ केला.
मनाचा इतका क्षुद्र की आपल्याकडून अनवधानाने का होईना पण अन्याय झाला, हे कबुल करण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे नाही.
अशा राक्षसी वृत्तीच्या व्यक्तीपासून सावध रहावे.

देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागून मोठ्या हालचाली करून आणि एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून राज्यातील
महाविकास आघाडी सरकार पाडल्याने महाविकास आघाडीचे सर्वच नेते हे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत.
आता ही खदखद धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
धुळ्यासह संपूर्ण राज्यात या पत्राची चर्चा आहे.

 

Web Title :- anil gote has written a letter to cm eknath shinde criticizing dy cm devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकार्‍यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क?

 

CM Eknath Shinde | राजकीय क्षेत्रात खळबळ ! CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?,

 

Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरे म्हणाले – ‘कसाबलाही असं आणलं नसेल’