पुन्हा एकदा ‘जंगल जंगल बात चली है, पता चला है …

मुंबई : वृत्तसंस्था – ‘द जंगल बुक’ या कादंबरीवर आधारित ‘मोगली’ या चित्रपटाने लहान मुलां सोबतचं मोठ्यांनाही वेड लावले आहे. आता हा चित्रपट पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट नेटफ्लिक्स’या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता  येणार आहे. मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ वॉर्नर ब्रदर्सने प्रोड्यूस केला आहे. हा चित्रपट येत्या  ७ डिसेंबरला  रिलीज होणार आहे. या चित्रपटातील पात्रांना बॉलीवूडमधले  दिग्गज कलाकार आपला आवाज देणार आहेत.

चित्रपटातील सर्वाधिक आवडत्या शेरखान या पात्राला दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ आपला आवाज देणार आहे. बल्लू  हे लोकप्रीय पात्र अभिनेता अनिल कपूरच्या आवाजात बोलताना दिसणार आहे. तर बघिरा या पात्राला अभिषेक बच्चन आपला आवाज देणार आहे. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिचा आवाजही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ती निशा या पात्राला  तर करिना कपूर  धूर्त अजगराच्या पात्राला आवाज आपला आवाज देणार आहे.

अनिल कपूर व जॅकी श्रॉफ ही जोडी जेव्हाजेव्हा पडद्यावर आली, तेव्हा तेव्हा सुपरहिट ठरली. त्यामुळे ‘नेटफ्लिक्स’च्या या चित्रपटाबद्दल साहजिकचं उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतात वेगाने पाय पसरत असलेल्या ‘नेटफ्लिक्स’या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चिमुकल्यांना वेड लावणारा ‘मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ हा चित्रपट रिलीज होत आहे.

मोगली बद्दल
रूडयार्ड किपलिंगच्या ‘द जंगल बुक’ या कादंबरीवर आधारित ‘मोगली’ या चित्रपटाचे लहान मुलांसोबत मोठी माणसेही चाहते आहेत.  ‘मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ वॉर्नर ब्रदर्सने प्रोड्यूस केला आहे. २०१२ मध्ये बनलेला हा चित्रपट खरे तर २०१६ मध्येचं रिलीज होणार होता. मात्र त्याचवर्षी एप्रिलमध्ये डिज्नीचा ‘द जंगल बुक’ रिलीज झाला. या चित्रपटाने जगभरात प्रचंड कमाई केली. भारतातचं या चित्रपटाने १८८ कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे वॉर्नर ब्रदर्सने या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकली होती आणि शेवटी याचे हक्क व्हिडिओ स्ट्रिमिंग वेबसाईट ‘नेटफ्लिक्स’ला विकले होते.

द जंगल बुक
द जंगल बुक (१८९४) हा नोबेल पुरस्कार विजेता इंग्रजी लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या कथेचा संग्रह आहे. ही कथा प्रथम १९३९-९४ मध्ये मासिके प्रकाशित झाली. मूळ कथांसह छापलेली काही चित्रे जॉन लॉकवुड किपलिंग, रुडयार्डच्या वडिलांनी बनविली होती. रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म भारतात झाला आणि त्यांनी भारतातल्या त्याच्या अवघ्या सहा वर्षांच्या काळात भारतात घालविला. त्यानंतर, इंग्लंडमध्ये दहा वर्षानंतर ते भारतात परतले आणि पुढील साडेतीन वर्षे तेथे राहिले.रुडयार्डने जेव्हा हे वरमोंटमध्ये वास्तव्य केले तेव्हा ही कहानी  लिहिली गेली. जंगल बुकच्या कथेमध्ये  मोगली नावाचा एक मुलगा आहे जो जंगलमध्ये हरवला जातो आणि त्याचे पोषण एक लांडगा करतो आणि शेवटी तो गावात परत येतो अशी या चित्रपटाची कथा आहे.