Anil Kapoor | अनिल कपूर गंभीर आजाराच्या उपचारासाठी जर्मनीमध्ये; व्हिडिओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Anil Kapoor | बॉलीवूडमधील सुपरस्टार अनिल कपूर (Anil Kapoor) सध्या एका कारणामुळे चाहत्यांच्या चर्चेत आला आहे. अभिनेता अनिल कपूर यांनी आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो (Viral Video) व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून चहात्यांना त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता लागली आहे.

 

मिस्टर इंडिया अनिल कपूर सध्या जर्मनीमध्ये आहे. तर त्यांनी त्या व्हिडिओखाली ट्रीटमेंटचा शेवटचा दिवस आहे. आणि ते डॉक्टरांना भेटायला जात आहे असं म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मिस्टर इंडियानं काळ्या रंगाचा कोट परिधान केला असून, डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातली आहे. तर कॅप्शनमध्ये त्यांनी बर्फासोबत मस्त चालणं, जर्मनीमध्ये शेवटचा दिवस. (Anil Kapoor) मी माझ्या शेवटच्या ट्रीटमेंटसाठी (Germany) डॉक्टर मुल्लरला भेटायला जात आहे. डॉक्टर मुल्लर आणि त्यांच्या जादुई स्पर्शाला मी धन्यवाद करतो.

 

दरम्यान, त्यांच्या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून,
नक्की काय आजार झाला आहे? याबद्दल त्यांना प्रश्न विचारले आहे.
परंतु अद्याप अनिल कपूरने कमेंट्सला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
तर अजूनही रोगाचे निदान झालं नाहीये. त्यामुळे अनेक चहात्यांची त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाढत चालली आहे.

 

Web Title :- Anil Kapoor | Anil Kapoor in Germany for treatment of serious illness; The video went viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा