Video : भाजपचा प्रचार करताना दिसले अनिल कपूर, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशात निवडणूकीचे वातावरण गरम आहे. सर्व राजकीय पार्टीचे लोद प्रचारामध्ये व्यस्त आहे. निवडणूकीच्या अतिम निर्णयाला काही दिवसच उरले आहेत. अशामध्ये सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड पसरत आहे. या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर भाजपाचा प्रचार करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेता अनिल कपूर अभिनेत्री किरण खेरसाठी वोट मागताना दिसत आहे. व्हिडिओत अनिल कपूर त्याच्या मित्रांना सांगत आहे की, ‘चंडीगढ येथील लोकांसाठी किरणपेक्षा चांगली एमपी कोणी असू शकत नाही. किरणने पाच वर्ष खुप चांगले काम केले आहे. त्यांना जास्तीत जास्त मतदान करुन विजयी करा.’

हा व्हिडिओ सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. किरण खेर पुन्हा भाजपाची उमेद्वार म्हणून निवडणूक लढवत आहे. यश मिळण्याचा विश्वास दाखवत किरण म्हणाल्या की, माझी प्रतिमा स्पष्ट आहे. पुर्ण देशाला माझी प्रतिमा माहित आहे. हे माझे शहर आहे, माझे घर आहे. मी विधानसभेत खुप काम केले आहे. पाच वर्षे झाले मी चित्रपटसृष्टीत काम करत नाही.

Loading...
You might also like