63 वर्षीय अभिनेता अनिल कपूरनं बनवलं ‘एक्सरसाईज’मध्ये रेकॉर्ड, ‘गिनीज’नं दिलं सर्टीफिकेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुंबईतील हजारो लोक एमएमआरडीए ग्राऊंडवर एकत्र जमले आणि त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं. 2400 हून अधिक लोक एकत्र येत त्यांनी पोटाचं प्लँक करत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एलायंस लाईफ प्लँकथॉन इव्हेंटच्या दुसऱ्या एडिशनमध्ये प्लँक फॉर इंडिया या उपक्रमांतर्गत 2471 लोकांनी भाग घेतला होता.

मागील वर्षी पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाचा रेकॉर्ड तोडण्यात आला. मागील वर्षी पुण्यातील या कार्यक्रमात 60 सेकंदासाठी प्लँक एक्सरसाईज करण्यासाठी 2353 लोाकांनी भाग घेतला होता.

या उपक्रमावर बोलताना कंपनी म्हणाली, “जे लोक प्लँक करत आहेत त्यांनी भारतात उदयास येणाऱ्या खेळातील स्टार्सच्या ट्रेनिंग आणि डेव्हलपमध्ये त्यांनी योगदान दिलं आहे. या कॅम्पेनमध्ये अनुभवी अॅक्टर अनिल कपूर आणि अनेक स्पोर्ट सेलेब्स जसे की, मिताली राज, मेरी कोम, दुती चंद आणि सनील छेत्री यांनी सहभाग नोंदवला होता.” अनिल कपूरला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टीफिकेट देण्यात आलं.

आपला अनुभव सांगताना अनिल कपूर म्हणाला, “वर्ल्ड रेकॉर्डचा हिस्सा बनल्यानं आनंद वाटत आहे. ही एक्सरसाईज सिंपल प्लँकपासून सुरू होऊन निरोगी जीवनासाठी प्रेरणा देते.”