….म्हणून 40 वर्षाच्या ‘करिअर’मध्ये एकदाही ‘ऑन’स्क्रीन KISS केलं नाही, स्वतः अनिल कपूरनं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवुड अ‍ॅक्टर अनिल कपूर फिल्म इंडस्ट्रीमध्ये जवळपास 4 दशकांपासून कार्यरत आहे. या कालावधीत त्याने रोमान्स, अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सपोर्टींग रोल्स केले. अभिनेत्री 80 च्या दशकातील असो की 90 च्या अथवा त्यानंतरची, अनिल कपूरने जेव्हापासून आपली कारकिर्द सुरू केली आहे, प्रत्येक दशकातील अ‍ॅक्ट्रेससोबत त्याने रोमान्स केला आहे. परंतु, त्यांनी कधीही ऑन स्क्रीन किसिंग सीन दिला नाही. याचे कारण स्वत: अनिल कपूरने मलंग चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चींगच्या वेळी सांगितले.

अनिल कपूरला मलंगच्या ट्रेलर लॉन्चींगच्यावेळी विचारण्यात आले की, चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानीचे किसिंग सीन्स पाहून मनात असे येत नाही का की आपणही ऑनस्क्रीन किसिंग सीन दिले पाहिजेत. यावर उत्तर देताना अनिल कपूर म्हणाले, घरात मला मार पडावा असे तुम्हाला वाटते का. घरात सोनम आहे, रिया आहे, पत्नी सुनीता आहे. नंतर थोडे थांबून ते हसून म्हणाले, हो, खरे सागायचे तर मला याबाबतीत थोडे वाईट वाटते. ट्रेलर लॉन्चच्या वेळी अनिल कपूरसह आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी आणि इली अवरामसुद्धा आले होते. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक मोहित सूरी, आणि निर्माता लव रंजन, भूषण कुमार, अंकुर गर्ग आणि जय सेवकरामसुद्धा उपस्थित होते. हा चित्रपट 7 फेब्रुवारी, 2020 ला रिलीज होणार आहे.

ट्रेलरला मिळत आहे संमिश्र प्रतिसाद
हा एक अ‍ॅक्शन सस्पेन्स चित्रपट आहे, ज्यास रोमान्सचा तडका दिला गेला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला संमिश्र व्यूज मिळत आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारी पात्र रहस्यमय आहेत, ती प्रत्येक वेळी खून करण्यासंबंधी बोलताना दिसतात. चित्रपटात कुणाल खेमू निगेटिव शेड प्ले करत आहेत. तर दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर यांचे किसिंग पोस्टर पहिल्यापासूनच चर्चेत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/