‘मलायका-अर्जुन’च्या लग्नाबद्दल अनिल कपूरनं सोडलं मौन ! दिली ‘ही’ प्रतिक्रिया

 

बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नेहमीच आपल्या रिलेशनशिपमुळं चर्चेत येत असतात. दोघांनी आपलं नातं पब्लिकली स्विकार केलं आहे. अनेकदा दोघं फोटोही शेअर करत असतात. चाहत्यांना आता ही उत्सुकता आहे की, अर्जुन कपूरच्या घरच्यांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे. काका अनिल कपूरचं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. अनिल कपूरनं जे काही वक्तव्य केलं आहे त्यामुळं तुम्ही नक्कीच चकित व्हाल.

काय म्हणाला अनिल कपूर ?

अर्जुनचा काका अनिल कपूरला एका मुलाखतीत अर्जुन आणि मलायकाच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अनिल कपूर म्हणाला, “मी अर्जुनला चांगलंच ओळखतो. जी गोष्ट अर्जुनला आनंद देते ती मलाही चांगली वाटते. यावर मी काही कमेंट करणं योग्य नाही. कारण एखाद्याच्या खासगी आयुष्यावर कमेंट करणं मला आवडत नाही. त्याच्या आयुष्यात त्यानं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. आम्ही सारे त्याच्यासोबत आहोत.

अनिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो पागलपंती आणि मलंग असा सिनेमात काम करताना दिसला आहे.