#Video : अनिल कपूरचा ‘मलंग’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर अशा बॉलिवूड कलाकारांपैकी आहे जे आपल्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असतात. आज वयाच्या या स्टेजला असूनही ते नवीन स्टार्सलाही फिटनेसमध्ये मात देत असतात. अनिल कपूर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून भल्याभल्यांनाही घाम फुटेल. तुम्हाला सांगू इच्छितो की, अनिल कपूर यांची ही तयारी मलंग सिनेमासाठी आहे. ते या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

फिल्म मेकर मोहित सुरी यांनी मलंग या सिनेमाची अनाउंसमेंट केल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. इतकेच नाही तर, फिल्ममेकरने या सिनेमाचे स्टार आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनीचे सेटवरील फोटोही शेअर केले आहेत. या सिनेमात आदित्य आणि दिशा यांच्याव्यतिरीक्त अनिल कपूर आणि कुणाल खेमू हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सध्या अनिल कपूरचा या सिनेमासाठी मेहनत घेत असलेला एख व्हिडीओ समोर आला आहे. अनिल कूपर यांनी स्वत:च हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात अनिल कपूर रनिंग करताना दिसत आहे. फिटनेससाठी ते किती मेहनत घेत आहेत हे यातून दिसत आहे. या वयातही ते प्रचंड मेहनत घेतना दिसत आहे. अनिल कपूर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी खास कॅप्शनही दिले आहे. त्यांनी दिलेल्या कॅप्शनवरून स्पष्ट होत आहे की अनिल कपूर यांची ही सर्व तयारी मलंग सिनेमासाठीच आहे. आपल्या कॅपशनमध्ये अनिल कपूर म्हणतात की, “मलंग सिनेमाच्या शुटींगच्या तयारीला सुरुवात झाली आहे. येथून होत आहे एक नवी सुरुवात.”

Loading...
You might also like