‘हे’ आहे अनिल कपूरच्या फिटनेसचा राज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

नुकतचं बॉलीवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूरने वयाच्या साठीत पदार्पण केले आहे. वयाच्या साठीतही त्याचा फिटनेस आणि उत्साह वाखाणण्याजोगा आहे. वाढत्या वयाच्या खाणाखुणा कुठेही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही कारण या वयातही तो फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक आहे. अनेकदा अनिलच्या चाहत्यांना त्याच्या या फिटनेसच्या राजविषयी प्रश्न पडतो. मात्र आता चाहत्यांना या प्रश्नच उत्तर मिळालं आहे. अनिलने त्याच्या या फिटनेसचं रहस्य एका व्हिडिओतून सगळ्यांसमोर उलगडलं आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’375fcb5b-c86f-11e8-bc62-23c3a2c5fed4′]

‘कष्टाला पर्याय नाही’ अशा समर्पक कॅप्शनसहीत अनिल कपूरनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत साठीतला अनिल कपूर जीममध्ये घाम गाळताना दिसतोय. व्हिडिओत अनिल वेगानं इनडोर साइकल चालवत असून या वयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.

 

[amazon_link asins=’B017WDVV3M,B073FKXQ9H’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f456ed4a-c870-11e8-9d20-f920bdfc6bda’]