Video : मुलाचे बुट चोरताना पकडलं अनिल कपूरला, हर्षवर्धनकडून व्हिडीओ शेअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्टर अनिल कपूर फेब्रुवारीमध्ये रिलीज झालेल्या टोटल धमाल या सिनेमामुळे चर्चेत आले होते. चर्चेत येण्याचं कारण फक्त त्यांचे सिनेमातील काम नाही तर, ते प्रमोशनसाठी जिथेही गेले होते तेथे खूपच यंग आणि स्टायलिश अंदाजात दिसून आले. सिनेमातील कास्ट सोबत घेतलेल्या एका फोटोत ते त्यांच्या पिकं शुजमुळे चर्चेचा विषय बनले होते.

अनिल कपूर यांचा फिटनेस आणि चेहऱ्याचे तेज भलेही त्यांच्या वर्कआऊट आणि स्ट्रिक्ट रुटीनेमुळे असेल परंतु त्यांच्या लुकचं एक छोटे क्रेडिट त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरलाही जातं. हर्षवर्धनने आपल्या इंस्टाग्रामवरून मार्चमध्ये एक फोटो शेअर केला होता ज्यात पिता अनिल कपूर, यांनी तेच शुज घातले आहेत असे दिसत आहे तेच शुज घातलेला हर्षवर्धनने आणखी एक स्वत:चा फोटो शेअर केला आहे.

मंगळवारी हर्षवर्धनने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, अनिल कपूर आपला मुलगा हर्षवर्धनच्या शुज कलेक्शनमधून शुज काढताना दिसत आहेत. हर्षवर्धनच्या शुज रॅकमधून गुपचूप त्याचे शुज चोरतानाचा अनिल कपूरचा व्हिडीओ खूपच क्युट आहे. मार्चमध्ये शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये हर्षवर्धनने लिहिले होते की, “मी खूप सारे शुज खरेदी करत असतो. परंतु तेच माझे शुज घालून स्टाईल मारत असतात.

अनिल कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ते मलंग या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात आदित्य रॉय कपूर लिड रोल प्ले करताना दिसणार आहे. याशिवाय या सिनेमात दिशा पाटनीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मलंग या सिनेमाशिवाय अनिल कपूर पागलपंती आणि तख्त या सिनेमातही दिसणार आहेत.
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे