काय म्हणाले ? अनिल कपूर मलायका-अर्जुनच्या नात्याविषयी 

मुंबई : वृत्तसंस्था – काही महिन्यांपासून एकमेकांना गुपचूप  डेट करणारी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही जोडी आता सर्रास  सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसून येत आहे. मलायका सोबतच्या नात्यामुळे अर्जुन कपूरने सलमान खानशी  वैर घेतले होते .या दोघांच्या नात्याविषयी कपूर परिवाराने कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अर्जुनच्या काकाने म्हणजे अनिल कपूरने या नात्याविषयी अप्रत्यक्षपणे संमती दर्शवली आहे.

‘नो फिल्टर नेहा’ या कार्यक्रमात अनिल कपूर याने नुकतीच हजेरी लावली  यावेळी नेहानं अर्जून आणि मलायका या जोडप्याला तुम्हाला कोणता सल्ला द्यायचा आहे असा प्रश्न विचारला.त्यावर ‘मी अर्जुनला खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. त्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट मलाही आनंद देते. मला त्या दोघांच्या नात्याविषयी फार बोलायचं नाही कारण ही खूपच खासगी बाब आहे. पण आम्ही कुटुंबीय एका गोष्टीला खूप महत्त्व देतो ती म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधणं. तो तिच्यासोबत खुश आहे त्यामुळे आम्ही सर्वच त्याच्यासाठी आनंदी आहोत’. असं अनिल कपूर म्हणाले.

अरबाजखान पासून विभक्त झाल्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये पसरली होती या दोघानीं स्वतः साठी एक आलिशान फ्लॅटही घेतल्याची चर्चा आहे. अर्जुनने ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात आपलं नातं मान्य केलं होत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us