उंचे लोग उंची पसंद ! अनिल कपूरनं घातलं चक्क 9 हजारांचं ‘मास्क’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे तशी लोक आता खबरदारी घेताना दिसत आहेत. बॉलिवूड इंडसट्रीही काळजी घेत आहे. अलीकडेच मलंग सिनेमाची सक्सेस पार्टी पार पडली. या पार्टीत अनेक कलाकार मास्क घालून आले होते. या सगळ्यात लक्ष वेधलं ते म्हणजे अभिनेता अनिल कपूरनं. सध्या सोशलवर अनिल कपूरचीच चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B9pBeYAnUk_/?utm_source=ig_embed

मलंग सिनेमाच्या सक्सेस पार्टीत अनिल कपूर मास्क घालून आल्यानं चर्चेत तर आलाच परंतु त्यांनं घातेललं मास्कही एक प्रकारे विशेष ठरल्यानं त्याचीही चर्चा होताना दिसली. कारण या मास्कची किंमत जर ऐकली तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. सामान्य माणून जेव्हा मास्क घेण्यासाठी जातो तेव्हा तो 100 किंवा जास्तीत जास्त 200 रुपयांचा मास्क घेतो सध्या अनेक मास्क 200 हून अधिक किंमतीला मिळत आहेत. सामान्यांना हे मास्क खूप महाग वाटत आहेत. अशात अनिल कपूरचं मास्क चर्चेत आलं आहे. कारण मास्कची किंमत चक्क 9300 रुपये आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, डिझायनर विरगिल अब्लोह यानं हे मास्क अनिल कपूरसाठी डिझाईन केलं आहे. मास्कच्या किंमतीमुळं हे मास्क या पार्टीत चर्चेचा विषय ठरताना दिसलं.