Anil Kumble-Virat Kohli | ‘…म्हणून विराट कोहलीला कुंबळे प्रशिक्षक म्हणून नको होते’; तब्बल 5 वर्षांनी समोर आलं खरं कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Kumble-Virat Kohli | भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यातील 5 वर्षापुर्वीचा वाद सर्वश्रुत आहे. या वादामुळे अनिल कुंबळे यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता (Kumble-Kohli Case). मात्र त्यावेळी नेमकं काय झालं होतं?, याबाबत सर्व माहिती समोर आली आहे. (Anil Kumble-Virat Kohli)

2017 साली सुप्रीम कोर्टाने विनोद राय यांना बीसीसीआयमध्ये (BCCI) प्रशासकीय समितीचं प्रमुख म्हणून निवडलं होतं. विनोद राय यांनी त्यांच्या बीसीसीआयमधील अनुभवाबाबत लिहिलं आहे. ‘नॉट जस्ट ए नाइटवॉचमैन: माय इनिंग्स इन द बीसीसीआय’ या पुस्तकात त्यांना कुंबळे-कोहली प्रकरणाचा उलगडा केला आहे. (Anil Kumble-Virat Kohli)

विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनासोबत चर्चा झाली. कुंबळे शिस्तीबाबत गंभीर होते त्यामुळे संघातील खेळाडू खूश नव्हते आणि युवा खेळाडू घाबरले असल्याचं विराटने मला सांगितलं. त्यानंतर कुंबळेंना याबाबत विचारणा केल्यावर, संघातचं हित समोर ठेवून मी काम केलं आहे. तक्रारीपेक्षा यशस्वी रेकॉर्डला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे, असं कुंबळेंनी मला सांगितलं.

ज्याप्रकारे हे प्रकरण समोर आणलं गेलं त्यामुळे अनिल कुंबळे काळजीत पडले होते. कर्णधार आणि संघाला इतकं महत्त्व दिलं गेलं नाही पाहिजे. संघामध्ये शिस्त आणणं प्रशिक्षकाची जबाबदारी होती आणि वरिष्ठ असल्यामुळे खेळाडूंनी आपल्या विचारांचा सन्मान करायला हवा अशी कुंबळेंची इच्छा होती. तत्कालीन सीईओ राहुल जोहरी (CEO Rahul Johri) आणि कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी (Amitabh Chaudhary) यांनीही कोहली-कुंबळेसोबत चर्चा केली. दोघांमधील मतभेद गंभीर असून क्रिकेट सल्लागार समिती (Cricket Advisory Committee) उपयुक्त ठरेल, असं जोहरी आणि चौधरी यांना वाटलं.

 

तीन दिवस गांगुली, सचिन आणि लक्ष्मण (Ganguly, Sachin and Laxman) यांनी
लंडनमध्ये (Londan) कुंबळे आणि कोहलीसोबत वेगवेगळी चर्चा केली.
त्यानंतर कुंबळे यांना पुन्हा मुख्य प्रशिक्षक बवनण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र अचानक कुंबळे यांनी राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय सर्वांनाच धक्काच होता, असं विनोद राय यांनी आपल्या पुस्तकात सांगितलं आहे.

दरम्यान, मला बीसीसीआयने सांगितलं की कर्णधार कोहलीला माझी कोचिंग पसंत नाही.
त्याला मी मुख्य प्रशिक्षक असण्यावर आक्षेप असल्याने मला हैराण आहे.
मी कायम कोच आणि कर्णधार यांच्यातील मर्यादेचा सन्मान केला असल्याचं कुंबळे यांनी
आपल्या राजीनाम्यामध्ये म्हटलं असल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.

Web Title : Anil Kumble-Virat Kohli | young players of team india not happy with
coach anil kumble coa vinod rai book virat kohli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

 

Neha Sharma Bedroom Photo | नेहा शर्मानं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..!