वीरेंद्र सेहवागनं ‘या’ कारणासाठी अनिल कुंबळेची मागितली ‘माफी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी फिरकी गोलंदाज आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे याचा काल 49 वा वाढदिवस झाला. कुंबळे याचा जन्म 17 ऑक्टोबर 1970 रोजी बंगळुरूमध्ये झाला होता. त्याच्या वाढदिवशी अनेक खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या.

खऱ्या आयुष्यात देखील शतक झळकवावे –
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने कुंबळे याला खास आपल्या शैलीत शुभेच्छा दिल्या. भारताच्या सर्वात मोठ्या मॅच विनरला आणि एका शानदार मार्गदर्शकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा प्रकारे त्याने कुंबळेला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्याने पुढे लिहिले कि, तुम्हाला दुसऱ्या शतकापासून दूर ठेवल्याबद्दल माफ करा. मात्र तुम्ही खऱ्या आयुष्यात देखील शतक पूर्ण करावे. फक्त 51 बाकी आहेत. वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. कुंबळे हा शानदार गोलंदाजाबरोबरच एक उत्तम फलंदाज देखील होता. त्याने आपल्या 132 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीमध्ये 5 अर्धशतक आणि 1 शतकाच्या साहाय्याने 2500 हुन अधिक धावा देखील केल्या. मात्र त्याच्या दुसऱ्या शतकापासून तो केवळ 13 धावा दूर राहिला होता. याचबद्दल सेहवागने त्याची माफी मागितली आहे.

तुमच्याकडून खूप काही शिकलो –
माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने ट्विट करत कुंबळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या सर्वात मोठ्या मॅच विनरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. मी ज्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलॊ त्यामधील तुम्ही सर्वश्रेष्ठ होता, असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

दरम्यान, कुंबळे याने भारताकडून सर्वाधिक म्हणजेच 956 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. देशासाठी 17 वर्ष खेळलेल्या कुंबळे याने यादरम्यान कसोटी सामन्यांमध्ये 619 तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 337 विकेट घेतल्या.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या