धक्कादायक ! मल्याळम अभिनेते अनिल नेदुमंगद यांचा धरणात बुडून मृत्यू

इडुक्की/केरळ : वृत्तसंस्था – मल्याळम सिनेमातील लोकप्रिय अभिनेता अनिल नेदुमंगदचा (Anil nedumangad) शुक्रवारी (दि.25) धरणात बुडून मृत्यू झाला. ते 48 वर्षांचे होते. अनिल केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील होते. तिथे ते मलंकरा धरणावर मित्रांसोबत आंघोळ करायला गेले होते. तिथेच त्यांचा बुडून मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की, तो मित्रांसोबत धरणावर आंघोळ करायला गेला होता. फार खोलात गेल्यावर त्यांना बाहेर येता आले नाही. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ते त्यांच्या आगामी थोडुपुजा सिनेमाचं शुटींग करत होते.

इडस्ट्रीतील लोकांना त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. अनिल नेदुमंगदने अय्यप्पम कोशियुम, परोल, किस्मत आणि कल्याणम सारख्या चित्रपटात काम केले होते. त्यांनी टीव्ही अँकर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.