मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या वांद्रे पूर्व (Bandra East) भागातील कार्यालयावर कारवाई करत ते पाडण्यात आले. पाडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) तिथे येणार होते. यावरून ठाकरे गट समर्थक चांगलेच आक्रमक झाले. अनिल परब यांनी देखील किरीट सोमय्या यांनी येथे येवूनच दाखवावे असे खुले आव्हान दिले. जर किरीट सोमय्या येथे आले तर त्यांचा योग्य तो पाहुणचार शिवसैनिक करतील. असे आव्हान यावेळी बोलताना अनिप परब (Anil Parab) यांनी किरीट सोमय्या यांना दिले.
अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्यानंतर आक्रमक झालेले अनिल परब समर्थक थेट म्हाडा कार्यालयात (MHADA Office) जाऊन धडकले. त्यामुळे म्हाडा कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण झाले होते. पोलिसांना या जमावाला आवरताना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली.
यावेळी अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर परब निवडक कार्यकर्त्यांसह म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलण्यासाठी आत गेले. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र, पोलिसांनी देखील बळाचा वापर करू नये. अन्यथा पुढील परिस्थितीला मी जबाबदार राहणार नाही, असे यावेळी परब यांनी म्हटले.
दरम्यान, वांद्रे पूर्व परिसरात म्हाडा वसाहतीमध्ये अनिल परब यांचे कार्यालय होते. माझा जन्म याच इमारतीत झाला. या इमारतीत मी लहानाचा मोठा झालो. आता या इमारती म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाही. सोसायटीची जागा मला वापरायला दिली होती. रहिवांशाच्या विनंतीवरुन जनसंपर्क कार्यालयासाठी सोसायटीची जागा वापरत होतो. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्यांनी म्हाडा, लोकायुक्त यांच्याकडे जाऊन माझं अनधिकृत कार्यालय आहे हे भासवून मला नोटीस द्यायला लावली. म्हाडाच्या नोटीसवर मी ही जागा माझी नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तेव्हा म्हाडाने नोटीस मागे घेतली. यानंतर म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांनी कार्यालयाचे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज केला. म्हाडाने त्याला नकार दिला. यासाठी किरीट सोमय्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत होते, असा आरोप अनिल परब (Anil Parab) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.
तर, म्हाडाच्या या ५६ वसाहतींचा लवकरच पुनर्विकास (Colony Redevelopment) होणार आहे.
त्यावेळी रहिवाशांना २२० चौरस फुटाची आहे तेवढीच जागा द्यायची, हा डाव आहे.
किरीट सोमय्या यांनी बिल्डर्सकडून सुपारी घेतली असावी, असा आरोप अनिल परब यांनी केला.
पाडण्याचे काम करण्यात आलेल्या जागेची पाहणी करायला किरीट सोमय्या म्हाडाचे अधिकारी आहेत का?,
असा सवालही यावेळी बोलताना अनिल परब यांनी उपस्थित केला.
या सर्व प्रकारानंतर अनिल परब यांनी म्हाडाचे सीईओ मिलींद बोरीकर (MHADA CEO Milind Borikar) यांना चांगलेच सुनावले.
वांद्रे येथील वसाहतीमध्ये पाडण्यात आलेल्या कार्यालयाशी माझा संबंध आहे का?
नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा, तोपर्यंत मागे हटणार नाही, असे अनिल परब यांनी म्हटले.
यावर आता म्हाडाकडून काय भूमिका घेण्यात येणार, हे पाहावे लागेल.
अनिल परब म्हाडाच्या कार्यालयात गेल्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले होते.
या सर्व कार्यकर्त्यांना सोडा, असेही अनिल परब यांना म्हटले आहे.
अनिल परब यांच्या पाडण्यात आलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी जाण्यासाठी खासदार किरीट सोमय्या निघाले होते.
पण यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे मुंबई पोलिसांकडून त्यांना बीकेसी येथे रोखण्यात आले.
Web Title :- Anil Parab | anil parab office in mhada colony demolished thakceray camp get aggressive against mhada and kirit somaiya
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक