Anil Parab : कोरोनाने मृत्यू झालेल्या ST कर्मचाऱ्यांच्या वारसांना 6 महिन्यांत नोकरी, 5 लाखांची आर्थिक मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी मोठा दिलासा दिला आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना एसटी महामंडळाच्या निकषाप्रमाणे 5 लाखांची मदत देण्याची घोषणा मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या 6 महिन्यांमध्ये अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेतले जाईल, असे परब यांनी सांगितले. याशिवाय कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही 30 जून 2021 पर्यंत वाढविल्याचे परब यांनी जाहीर केले.

एसटीचा 73 वा वर्धापनदिन मंगळवारी (दि. 1) पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही एसटीचा वर्धापनदिन महामंडळाच्या मुख्यालयात साधेपणाने साजरा झाला. यावेळी परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच महामंडळातील विविध विभागांचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एसटीच्या वर्धापदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतानाच मंत्री परब यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान यावेळी महामंडळाने उपलब्ध केलेल्या योजना, सेवा तसेच महामंडळाची विविध माहिती अधिकाधिक प्रवाशांपर्यत पोहोचवण्यासाठी एसटीने आपले स्वतःचे ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व टेलीग्राम या समाजमाध्यमांवर आपले अधिकृत खाते उघडले आहे. ॲड. परब यांच्या हस्ते एसटीच्या फेसबुक, इन्स्टाग्राम व टेलग्राम या समाजमाध्यमांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी दुरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील महामंडळाच्या विविध अधिकाऱ्यांशी बोलताना मंत्री परब म्हणाले की, लॉकडाऊनमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महामंडळाला आर्थिक बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दात अ‍ॅड. परब यांनी कामगारांना आश्वस्त केले. तसेच राज्यात गेल्या 70 वर्षाहून अधिक काळ एसटीचा प्रवास सुरु आहे. ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अभिमानाने एसटीचा उल्लेख करावा लागेल. एवढे कार्य एसटीने गेल्या अनेक वर्षात केल्याचे मत परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. सरकार आपल्या पाठीशी असून एसटीला चांगल्या परिस्थिती कस आणता येईल, प्रवाशांना चांगली सेवा कशी देता येईल यासाठी सर्वांनी हातात हात घालून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

 

Also Read This : 

 

RBI ची 4 जूनला महत्वाची बैठक ! महागाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणेची शक्यता

 

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

 

भाजपच्या सत्तेत येण्याच्या विधानांचा नवाब मलिकांकडून समाचार, ‘…म्हणून भाजपकडून सत्तेत येण्याची तारीख पे तारीख’ (व्हिडीओ)

 

पोटातून सतत गुरगुळण्याचा आवाज येतो

 

फडणवीस यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्यानं घेतली शरद पवारांची भेट

 

ऑफिस किंवा घरी सतत बसून काम करत असाल तर वाढू शकते शरीरातील चरबी ! ‘या’ 7 टीप्स वापरून रहा ‘फिट’