Anil Parab | अनिल परब यांच्याकडून दणका ! किरीट सोमय्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Anil Parab | भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) ठाकरे सरकारमधील मंत्र्यांविरोधात गैरव्यवहाराचे आरोप करण्याचा सुर सपाटाच लावला आहे. यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमधील (BJP and Mahavikas Aghadi) राजकीय शीतयुद्ध चव्हाट्यावर आल्याचे दिसते. यावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र आता शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी किरीट सोमय्यांच्याविरोधात (Kirit Somaiya) 100 कोटींचा दावा दाखल केला आहे.

नुकतंच किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
मात्र, सोमय्यांच्या या आरोपावरुन परबांनी किरीट सोमय्यांना माफी मागण्यासाठी 72 तासांची मुदत दिली होती. 72 तास उलटल्यानंतर सोमय्यांनी काही अद्याप माफी मागितली नाही.
यावरुन मंत्री अनिल परबांनी सोमय्या यांच्या विरोधात रितसर कायदेशीर पाऊल उचलत 100 कोटींचा दावा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर 10 विविध घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
एसटी महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, दापोलीला अनधिकृत दहा कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओ ट्रान्सफर घोटाळा, वाझेचे मुंबई पालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, भेंडी बाजारमधील मोठा री-डेव्हलपमेंट प्रकल्प 50 कोटींचा घोटाळा अशा अनेक चौकशी परब यांच्या विरोधात सुरू असल्याचा दावा सोमय्याकडून करण्यात आला होता.

Web Title : Anil Parab | claim of rs 100 crore was filed against kirit somaiya say shivsena leader anil parab

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MHD Admit Card 2021 | महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीसाठी प्रवेशपत्र जारी; असं करा डाउनलोड प्रवेशपत्र

Pune News | राज्यातील नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी आजपासून बेमुदत संप

Gondia Crime | कुटुंबातील तिघांची हत्या करुन स्वत:लाही संपवलं; जिल्ह्यात प्रंचड खळबळ