Anil Parab | ED चा धोका मला नाही, आतापर्यंत चौकशी नाही, होणारही नाही

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाईचा बडगा उभारला आहे. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. राज्यातील काही सत्ताधारी नेत्यांची अनेक प्रकरणावरून ED कडून चौकशी सुरु आहे. अशातच भाजप आणखी सत्ताधारी नेत्यांची, मंत्र्यांची नावे समोर करतो आहे. मागील काही महिन्यापासून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Parab) यांच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (enforcement directorate) तपास घेतला आहे. देशमुख यांच्यानंतर भाजपने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचादेखील नाव घेतलं. यावरून अनिल परब यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावेळी परब (Anil Parab) हे माध्यमाशी बोलत होते.

Anil Parab | i am not risk ed so far no investigation future also anil parab

औरंगाबाद दौऱ्यावर असताना मंत्री अनिल परब (Anil Parab) बोलताना म्हणाले, ‘आरोप करायचे त्यांना करू द्या, माझ्यावर ED ची कुठलीही कारवाई झालेली नाही आणि होणारही नाही. त्याचा मी जास्त विचारही करत नाही अशी स्पष्ट भूमिका मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली आहे. भाजप कडून ED चौकशीबाबत वारंवार आरोप होत असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. दरम्यान,देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) परिवहन मंत्री अनिल परब यांचा क्रमांक लागणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाकडून (BJP) वारंवार राज्यातील इतर मंत्र्यांची सक्तवसुली संचालनालया (ED) मार्फत चौकशी होणार, असा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पत्रकारांनी मंत्री अनिल परब यांना सवाल केला असता. परब यांनी रोखठोक शब्दात त्याचे उत्तर दिले आहेत. फक्त महाविकास आघाडीतील नेतेच ED च्या चौकशीत अडकत आहेत. या प्रश्नावर आणि परब म्हणाले, ‘आरोप करायचे त्यांनी करू द्या, मी त्यांना उत्तर देणार नाही, मला ज्यांना उत्तर द्यायचे गरजेचे आहे त्यांना देईल असं म्हणत, ‘माझ्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, होणारही नाही, असं मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.

या दरम्यान, मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh) यांनी राज्याचे
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत हाय कोर्टाने दिलेल्या
आदेशानुसार CBI ने प्राथमिक तपास करून रिपोर्ट दिला होता. त्याच्या आधारावर ने देशमुख
यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव
पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली गेली आहे. आता ED ने अनिल देशमुख
यांच्या पत्नीला देखील काल नोटीस बजवण्यात आलीय.

हे देखील वाचा

Lonavla News | लोणावळ्यात जमावबंदी ! धबधब्यापासून 1 किमी परिसरात वाहनांना बंदी, ‘या’ पर्यटन स्थळांवर नियम लागू

Ramdas Athawale | ‘राजकीय नुकसान टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे’ : रामदास आठवले

Irregular Period Problem | मासिक पाळी येण्यास विलंब होत आहे का? तर घरगुती उपचार करून पहा, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anil Parab | i am not risk ed so far no investigation future also anil parab

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update