Anil Parab | ‘मराठी माणसाच्या हिताच्या आड कुणी आलं तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही’; अनिल परब यांचा किरीट सोमय्या यांना इशारा

0
278
Anil Parab | if you trouble poor marathi people i and shivsena will not remail silent anil parab challenge to kirit somaiya
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे अनाधिकृत कार्यालय पाडण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी भाजप (BJP) खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. यावेळी बोलताना अनिल परब यांनी खासदार किरीट सोमय्यावर जोरदार टीका केली. जर मराठी माणसाच्या हिताच्या आड कुणी आलं तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही. असा इशारा त्यांनी (Anil Parab) यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांना दिला.

 

तर याबाबत पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, ‘सोमवारपासून एक बातमी वृत्तवाहिन्यांवर देण्यात येत आहे. अनिल परब यांचे अधिकृत कार्यालय तोडलं गेलं. ही इमारत १९६० मध्ये बांधण्यात आली. माझा जन्म याच इमारतीत झाला. याच इमारतीत मी लहानाचा मोठा झालो. मात्र, जेव्हा मी आमदार झालो, तेव्हा या इमारती मालकीच्या झाल्या होत्या. म्हाडाकडे राहिल्या नव्हत्या. असं मला इमारतीतील लोकांनीच सांगितलं होतं. माझं कार्यालय इथेच होतं. अनेक वर्ष ही जागा मी वापरत होतो. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्यांनी म्हाडा, लोकायुक्त यांच्याकडे जाऊन माझं अनधिकृत कार्यालय (Unauthorized office) आहे हे भासवून मला नोटीस द्यायला लावली असं अनिल परब यांनी सांगितलं. किरीट सोमय्याने बिल्डर्सकडून सुपारी घेतली आहे.’ असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांच्यावर केला.

म्हाडाकडून (MHADA) देण्यात आलेल्या नोटीशीवर उत्तर देताना मी (Anil Parab) सांगितले की, सदर जागा माझी नाही. त्यानंतर म्हाडाकडून मला पाठविण्यात आलेली नोटीस मागे घेण्यात आली. यानंतर इमारतीमधील रहिवासी कोर्टात गेले. त्यांनी सांगितलं की, रेग्युलरायझेशनसाठी तुम्ही अर्ज केला. तसा अर्ज करण्यात आला. आम्ही म्हाडाला हे सांगितलं. म्हाडाने हे रेग्युलराईज करता येणार नाही सांगितलं. किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला होता. त्यानंतर या जागा इमारतीने स्वतःहून मोकळ्या केल्या. गरीब मराठी माणूस या विभागात राहतो. त्यांची ही जागा आहे. ही जागा सोसायटीची आहे. म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत ज्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहेत. त्यात अशा प्रकारची ऑर्डर येणं आणि लोकांना मूळ घरं २२० स्क्वेअर फूटचीच घरं द्यायची या हेतून किरीट सोमय्यांना बिल्डर्संकडून सुपारी घेतली असावी. असं देखील यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले.

 

आज याबाबतची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. या ऑर्डरचा फायदा घेऊन ब्लॅकमेल केलं जाईल असं वाटत आहे.
आम्ही याचा जाब म्हाडाला देखील विचारणार आहोत. असं अनिल परब म्हणाले. किरीट सोमय्यांना माझे आव्हान आहे
की, नारायण राणे घर तोडण्याचे आदेश देखील कोर्टाकडून दिले गेले आहेत.
ती कारवाई पहायला किरीट सोमय्या माझ्यासोबत येणार का? असा टोला देखील यावेळी बोलताना अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना लगावला.
गरीबांच्या पोटावर भाजपा आणि किरीट सोमय्या येणार असतील आम्ही कुणीही शांत बसणार नाही.
मी यासंदर्भात मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis)
यांनाही भेटणार आहे असं देखील यावेळी बोलताना अनिल परब यांनी सांगितलं.

 

Web Title :- Anil Parab | if you trouble poor marathi people i and shivsena will not remail silent anil parab challenge to kirit somaiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू