Anil Parab | एसटी संपासंदर्भात राज्य सरकारच्या धोरणाबाबत परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Parab | गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Worker Strike) चालू आहे. एसटी कर्मचारीही (MSRTC) वलिगीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे हा संप कधी मिटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विरोधकांनी यावरून आज सभागृहात सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर याबाबत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी निवेदन दिलं आहे.

 

भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी स्थगन प्रस्ताव सादर केला. याचवेळी बोलताना त्यांनी संपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. संपामुळे 100 कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केली. न्यायालयात (Mumbai High Court) तारखांवर तारखा पडत आहेत मात्र सरकारकडून अद्याप काही तोडगा नाही, उलट सरकार (Maharashtra Government) संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनाच धमकी देऊन आम्ही तुम्हाला कामावरून कमी करू म्हणत आहे. आज कामकाज बाजूला ठेवत याबाबत चर्चा करावी, अशी मागणी शेलार यांनी केली होती.

 

विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारला मात्र भाजप (BJP) आमदार घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरू लागले.
त्यानंतर अनिल परब (Anil Parab) यांनी सरकारच्यावतीने निवेदन दिलं.
राज्य सरकारचं एसटी कर्मचाऱ्यांबाबत धोरण अधिवेशन (Maharashtra Budget Session) संपण्याच्या आता सभागृहात मांडलं जाईल,
असं अनिल परब म्हणाले.

 

दरम्यान, आता राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी नेमका काय तोडगा काढतं ? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Anil Parab | Maharashtra government to clear stand on msrtc workers strike before the end of ongoing budget session says anil parab

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा