Anil Parab | एसटी विलीनीकरणाचा अहवाल 2 दिवसात, अनिल परब यांची माहिती

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) शासनात विलीनीकरण करावे यावर एसटी कर्मचारी (ST Workers) ठाम असून अद्यापही त्यांचा लढा सुरू आहे. विलीनीकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची (Three Member Committee) नेमणूक करण्यात आली आहे. त्या समितीच्या अहवालानंतरच त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. दरम्यान, मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे (Sub-Regional Transport Department) आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी विलीनीकरणासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. नियुक्त केलेल्या समितीकडून येत्या दोन दिवसात अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर एसटीच्या विलीनीकरणाबाबत (Merger) पुढचे पाऊल उचलणे शक्य होणार असल्याचे अनिल परब (Anil Parab) सांगितले.

 

अनिल परब (Anil Parab) म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. संप मिटवण्याबाबत शासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले होते. मात्र,त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. न्यायालयाच्या आदेशानुसार (Court Order) राज्य शासनाने (State Government) त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे.

शासनाने नियुक्त केलेल्या त्या समितीचा अहवाल दोन दिवसात मिळणार आहे.
तो आल्यानंतर न्यायालयाला सादर केला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या, हक्क एसटी बंद ठेऊन पूर्ण होऊ शकत नाही.
एसटीचा संप नाहक लांबविण्यात आला आहे. समिती जो निर्णय देईल, तो आम्ही मान्य करू.
ज्यांना हा निर्णय मान्य नाही त्यांनी अपिलात जावे असेही परब यांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- Anil Parab | MSRTC merger report in two days says anil parab

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yellow Teeth Home Remedies | दातांचा पिवळेपणा तुमच्यासाठी सुद्धा समस्या बनला आहे का? ‘या’ 6 घरगुती उपायांनी होतील चमकदार

 

LIC New Jeevan Anand | एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवर मिळतील 10 लाख, रोज जमा करावे लागतील केवळ 73 रु.

 

Tips For Healthy Heart | हिवाळ्यात हृदयाची घ्या मनापासून काळजी, निरोगी हृदयासाठी आहारात करा ‘या’ 6 विशेष फूड्सचा समावेश

 

Benefits Of Paneer | रोज सकाळी अशाप्रकारे खाण्यास सुरू करा 100 ग्रॅम पनीर, दूर पळतील आजार; होतील 10 जबरदस्त लाभ

 

Pune Political News | ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर काँग्रेसला मोठा झटका, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश