Anil Parab | शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार

0
46
Anil Parab | Shivsena leader and maharashtra minister anil parab and ed
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते (Shiv Sena leader) आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकवत शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्याकडून धक्का बसल्यानंतर आता शिवसेनेला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. बेकायदा रिसॉर्ट प्रकरणात (Illegal Resort Case) परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची ईडीकडून चौकशी (ED Inquiry) सरु आहे. याच प्रकरणात अनिल परब (Anil Parab) यांच्यावर अटकेची (Arrest) टांगती तलवार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. जर परब यांना अटक झाली तर शिवसेनेला हा दुहेरी झटका बसू शकतो.

 

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स (Summons) बजावले होते. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून परब यांची आज सकाळपासून चौकशी सुरू असून परब यांच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयाबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेही जमण्यास सुरुवात झाली आहे.

 

भाजपचे (BJP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा (Money Laundering) आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता परब हे चौकशीसाठी हजर झाले आहेत. परब यांना अटक झाली तर शिवसेनेला हा मोठा धक्का असेल असे मानले जात आहे. कारण आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Brihanmumbai Municipal Corporation Election) दृष्टीने परब हे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत. मुंबईतील वॉर्डमधील समीकरण अनिल परबांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.

काय आहे रिसॉर्ट प्रकरण?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील
साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते.
90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते.
मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ड पाडण्यात आले नाही.
या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लॉड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.

 

Web Title :-  Anil Parab | Shivsena leader and maharashtra minister anil parab and ed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम केवळ 40 दिवसात पूर्ण

 

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

 

Maharashtra Political Crisis | ‘आमदारांना किडनॅप करुन सुरतला नेलं’- संजय राऊत