Anil Parab | अनिल परब यांची सुरक्षा वाढवली; जाणून घ्या कारण

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मुद्यावरुन एसटी कर्मचाऱ्यांनी संप (ST Workers Strike) पुकारला आहे. राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्या आहेत मात्र कर्मचारी आपल्या मुद्यावर अद्याप ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. निलंबनानंतर (suspension) त्या कर्मचाऱ्यांना आता बडतर्फ केले जाऊ शकते, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी रत्नागिरीत (Ratnagiri) दिला आहे. याच ठिकाणी ते मुक्कमाला असून या ठिकाणापासून अवघ्या 100 मीटरवर एसटी आंदोलक आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनिल परब (Anil Parab) यांच्याभोवती कडक सुरक्षा (tightened security) तैनात करण्यात आली आहे.

 

राज्य सरकारने (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, कर्मचारी अद्याप आपल्या मागणीवर ठाम आहेत. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत देखील संपली आहे. मात्र मुदत संपल्यानंतर बहुतांश कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. मागील महिनाभरापासून कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे.

 

दरम्यान, एसटी संपात (MSRTC)सहभागी झालेले कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी बस फोडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने (ST Corporation) आता कठोर कारवाईचे धोरण अवलंबल्याचे दिसून येत आहे. 11 कर्मचाऱ्यांना महामंडळाने तातडीने बडतर्फ केले आहे. तर रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या दोन हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर संपात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. जिल्हा शासकीय विश्रामगृहात (Rest House) परब मुक्की आहेत.
त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून अवघ्या 100 मीटरवर संपकरी एसटी कर्मचारी आहेत.
त्यामुळे परब यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. विश्रामगृहाला 50 कर्मचाऱ्यांचे कडे आहे.
6 वरिष्ठ पोलीस अधिकारी (Senior police officer) हे काल रात्रीपासून परब यांच्या सुरक्षेत आहेत.
कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी परब यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

 

विलीनीकरणाच्या (Merger) मुद्यावर हायकोर्टाने (High Court) नेमलेली कमिटीच निर्णय घेणार आहे.
तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा.
त्याव्यतिरिक्त असलेल्या मुद्यांवर चर्चा करावी, असं आवाहन राज्य सरकार वारंवार करत आहे.
परंतु संपकरी विलीनीकरणाच्या मुद्यावर अडून बसले आहेत. सरकारने भरघोस पगारवाढ दिली आहे.
या सगळ्या गोष्टी देऊनही केवळ एका मुद्यावर कामगार अडून आहेत.
मला असं वाटते एसटीचे आणि जनतेचे मोठे नुकसान होत आहे.
एसटी संपातील कामगारांवर कारवाई करण्याचा विचार केला जात आहे, असे परब यांनी सांगितले.

 

Web Title :- Anil Parab | shivsena leader and minister anil parab in ratnagiri tightened security by police during st strike msrtc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

SCSS | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमच्यासाठी ठरू शकता लाभदायक ! केवळ पाच वर्षाच्या मॅच्युरिटीवर देईल 14 लाख रुपये; जाणून घ्या

Rytasha Rathore Topless Photos | छोट्या पडद्यावरील रिताशा राठोडनं इंस्टाग्रामवर शेअर केले टॉपलेस फोटोज्, तिच्या न्यूड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

LIC Alert | एलआयसीनं ग्राहकांना केलं सतर्क ! Logo  हून ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या