Anil Parab | केंद्राने दिलेली मुदत संपल्याने मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाईची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Anil Parab | गेल्या दोन वर्षापासून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) नेते, मंत्र्यांच्या मागे कारवाईचा ससेमिरा लागला आहे. राज्यात तर काही मंत्री ईडी, सीबीआयच्या रडारवर आहे. यातच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आता कारवाईच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. परब यांच्या किनारपट्टी भागातील रिसॉर्टवर (Resort) केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने लवकरच कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने परब यांना सीआरझेड (CRZ) अंतर्गत येणाऱ्या रिसोर्टवर कारवाई करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. यामध्ये मुदत दिली होती. ती मुदत आता संपली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा नोटीस बजावून कारवाई (Action) करण्याची शक्यता आहे.

 

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब (Anil Parab) आणि मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या सीआरझेड अंतर्गत येणारे या संपत्तीच्या मुद्द्यावरून स्पष्टीकरण दिलं होतं. यानंतर याबाबत केंद्राने पर्यावरण खात्याच्या वतीने एक टीम पाठवून परब आणि नार्वेकर यांच्या संपत्तीची पाहणी केली होती. दरम्यान, परब यांनी बांधलेलं पंचतारांकित रिसॉर्ट तोडण्या बाबत यात कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे याबाबत सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण खात्याला (Central Environment Department) महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) माध्यमातून कारवाई करायची मागणी केलीय. दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने कुठलीही कारवाई केली गेली नाही. असा आरोप सोमय्यांनी केला.

दरम्यान, परब यांना हे बांधकाम तोडण्या करीता देण्यात आलेली मुदत संपलेली आहे.
त्यामुळे आता केंद्र सरकारच्या वतीने सदर बांधकाम तोडण्यात येण्याची शक्यता आहे,
सोबतच अनिल परब यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कलमांतर्गत कारवाई देखील होऊ शकते असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

 

 

Web Title :- Anil Parab | shivsena leader and minister anil parab will take action on dapoli resort case say bjp leader kirit somaiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Corporator Dhiraj Ghate | चाळीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यात वाढ, पालिकेने पुनर्विचार करावा; नगरसेवक धीरज घाटेंचे आयुक्तांना निवेदन

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 149 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी