Anil Parab | दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात मोठा ट्विस्ट ! आता अनिल परब म्हणाले – ‘साई रिसॉर्ट माझं…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Parab | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दापोलीकडे (Dapoli) गेले आहेत. कोकणात (Konkan) आज राजकीय शिमगा पाहायला मिळाला आहे. सोमय्या परिवहन मंत्री अनिल परब यांचं दापोलीमधील साई रिसॉर्ट (Sai Resort Dapoli) तोडण्यासाठी गेले आहेत. पोलिसांनी कशेडी घाटात (Kashedi Ghat) आणि टोल नाक्यावर नोटीस पाठवली होती. मात्र निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासोबत ते दापोलीच्या दिशेने गेले. मात्र अशातच अनिल परब (Anil Parab) यांनी थेट सोमय्यांना आव्हान दिलं आहे.

 

किरीट सोमय्या हे दापोलीमध्ये जाऊन वातावरण खराब करत आहेत. या रिसॉर्टची जी कायदेशीर कारवाई होयला पाहिजे ती झाली आहे. किरीट सोमय्या वारंवार या रिसॉर्टची माझा संबंध जोडू पाहत आहेत. रिसॉर्टती सर्व कागदपत्रे तपासली असून माझा या रिसॉर्टशी काही संबंध नाही त्यांनी हे रिसॉर्ट तोडून दाखवावंच असं अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटलं आहे.

 

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटते की, साई रिसॉर्टवरील कारवाईमुळे तेथील स्थानिक रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे की नाही हे ठरवणारे किरीट सोमय्या कोण आहेत?, जर बेकायदेशीर असेलच तर मी कोर्टात कायदेशीर लढाई लढण्यास तयार असल्याचं परब म्हणाले.

 

दरम्यान, दापोलीमध्ये किरीट सोमय्या दापोली पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं आहे. रिसॉर्टवर जाण्यास आम्ही ठाम असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Anil Parab | shivsena leader anil parab challenges bjp kirit somaiya over dapoli resort

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | पुणे शहरात समान पाणी पुरवठा होत नसल्याबद्दल खा. गिरीश बापट यांचा कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग

 

Namrata Malla Dance Video | समुद्राच्या मध्यभागी नम्रता मल्लानं केला ‘दो घूंट’ या गाण्यावर डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

 

High BP | किडनीमध्ये समस्या असेल तरी सुद्धा होऊ शकते ‘हाय ब्लड प्रेशर’, जाणून घ्या ‘बीपी’ हाय होण्याची 5 कारणे