Anil Parab | अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Anil Parab | एसटी महामंडळाला राज्य सरकारी सेवेत समावेश करण्याच्या मागणीवरुन एसटी कामगारांचा अनेक दिवसांपासून राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरु आहे. जोवर यावर तोडगा निघत नाही तोवर आम्ही संप मागे न घेण्यावर कामगार ठाम आहेत. या पार्श्वभुमीवर काल राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात बैठक झाली. मात्र ठोस निर्णय न झाल्याने संप आणखी चिघळला आहे. त्यातच आज अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर काळी शाई फेकण्यात आलीय. यावरुन चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

आज (मंगळवारी) एसटी कामगारांच्या (ST Workers Strike) मुद्द्यावरून जनशक्ती संघटनेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)
यांच्या शासकीय निवासस्थानावर काळी शाई फेकली आहे. त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानी गोंधळ देखील घातला आहे.
असा गोंधळ घालणा-या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

 

विलनीकरणावरुन मागील अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरुय. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
मात्र, सरकार MSRTC च्या विलनीकरणासाठी तयार नाही. विलनीकरणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलीय.
तरीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन कऱण्यात आले.
तसेच काहींची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. दरम्यान, शरद पवारांसोबत बैठक झाली यावेळी तरी संपावर तोडगा निघण्याची आशा होती.
तसेच न्यायालयाचा निर्णय आल्याशिवाय आम्ही काहीही करणार नाही, अशी भूमिका अनिल परब (Anil Parab) यांनी स्पष्ट केली आहे.

 

Web Title : Anil Parab | st workers strike black paint thrown on transport minister anil parab official residence in mumbai MSRTC Video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Suresh Lad | अजित पवार कोकण दौऱ्यावर असताना रायगड जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Chandrakant Patil | राज्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध? चंद्रकांत पाटील म्हणाले… 

BJP MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्‍शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला