Anil Parab | खासगीकरणावर अनिल परबांची माहिती; म्हणाले – ‘एसटी कामगारांसोबत लोकांचीही जबाबदारी राज्य सरकारवर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Parab | गेल्या काही दिवासांपासून एसटी कामगारांचे (ST workers) राज्यव्यापी आंदोलन सुरूच आहे. न्यायालयाने आणि राज्य सरकारने संप मागे घ्या असं सांगूनही कामगारांनी आपली भुमिका ठाम ठेवली आहे. तर, ‘एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. एसटी (MSRTC) खासगीकरणाचा विचार केला नाही. पण, वेगवेगळ्या पर्यायात खासगीकरण हाही पर्याय आहे. कामगारांसोबत लोकांचीही जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं’ परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितलं आहे.

 

एसटीच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन बोलताना अनिल परब (Anil Parab) म्हणाले की, ‘कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन दररोज करतोय. परंतु कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलिनीकरणाची मागणी उच्च न्यायालयानं जी समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आल्यावरच निर्णय घेऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. कामगारांच्या संपाचं नेतृत्व कोण करतंय? हे कळत नाही. एसटी संपामुळे कर्मचाऱ्यांचे किंबहुना एसटीचे नुकसान होतंय हे हानीकारक आहे. बाकीच्या राज्यातील परिवहन सेवेचा अभ्यास करत आहोत. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याशी दोनदा चर्चा केली. दोन्ही वेळा त्यांनी कामगारांशी बोलतो आणि कळवतो असं सांगितले. परंतु त्यांच्याकडून पुढे काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे नेमकं आंदोलनाचं नेतृत्व करतंय कोण? यावर प्रश्नचिन्ह आहे असं परब म्हणाले.

 

 

 

पुढे अनिल परब (Anil Parab) म्हणाले, तसेच कामगारांशी आझाद मैदानात जी गैरसोय होत आहे. त्याऐवजी चर्चेतून तोडगा काढता येतो. नेतृत्व करणाऱ्यांनी हे समजून घ्यायला हवं. सरकारचं म्हणणं आंदोलनकर्त्यांना सांगितले आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांचं भलं कशात आहे हे ओळखावं. संप ताबोडतोब मागे घेऊन वेतनवाढीचा प्रश्नावर सरकारशी चर्चा करून समस्या सोडवून घ्यायला हव्यात. असं ते म्हणाले.

 

तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सूचनेचा गंभीर विचार करुन त्यावर अभ्यास केला आहे.
कोरोनापूर्व काळात त्यांचा फॉर्म्युला योग्य होता. पण, आता परिस्थिती वेगळी आहे.
सरकारकडून पैसे घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवता येतील.
पण थोडा वेळ द्यावा लागेल. संप मागे घेऊन चर्चा करावी लागेल.
सरकारकडून एकतर्फी निधी आणायचा असेल तर त्यावर चर्चा सुरु आहे.
पण शासनास वेठीस धरुन हा संप सुटणार नाही. ज्यांना अल्टिमेटम दिला होता.
जे कामावर रुजू झाले नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरु झालीय. असंही परब यांनी सांगितलं.

 

Web Title :- Anil Parab | st workers strike state transport minister anil parab reaction MSRTC privatization

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा