Anil Parab ! पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, पण..

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य परिवहन महामंडळा (Maharashtra State Road Transport Corporation) च्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांच्या पाहणी दौऱ्यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (transport minister anil parab) हे आज (18 जून) पुण्यात (Pune) आले होते. त्यावेळी त्यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमात म्हणाले की, राज्यातील महापालिका निवडणुका (Municipal elections) महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार की वेगवेगळ्या हे तिन्ही पक्षातील वरिष्ठ ठरवतील. परंतु, कोरोना नियंत्रणात राहिल्यास महापालिकांच्या निवडणुका (Municipal elections) नियोजित वेळेतच होतील, असं स्पष्ट संकेत अनिल परब (Anil Parab) यांनी दिले. त्यावेळी परब (Anil Parab) हे माध्यमांशी बोलत होते. (If Corona stays in control, municipal elections will be held on time)
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

काय म्हणाले अनिल परब ?

राज्यातील कोरोना (Corona) प्रदूर्भाव कमी होत आहे. म्हणून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी फिरताना नियमांचे पालन करावे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यास उद्योग, व्यावसाय, दळणवळण पूर्ण क्षमतेने सुरू होऊन राज्य प्रगतीपथावर येण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नियमांचे पालन करावे.

एसटी डेपोवरील पेट्रोल पंप खुले करणार –

परब म्हणाले, एसटी महामंडळाचा (ST Corporation) आर्थिक स्त्रोत बळकट करण्यासाठी राज्यातील सर्व डेपोवरील पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. आता या डेपोवर केवळ महामंडळाच्या (ST Corporation) बसमध्ये पेट्रोल, डिझेल भरले जात आहे. त्यामुळे शासनाच्या विविध विभाग, खात्याच्या गाड्या अथवा खासगी गाड्यांनाही या डेपोवर पेट्रोल, डिझेल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन आहे. यामधून महामंडळाला (ST Corporation) उत्पन्नाचे एक निश्चित साधन निर्माण होणार आहे. म्हणून लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं परब (Anil Parab) यांनी म्हटलं आहे.\

प्रत्येक एसटी स्टॅंडवर प्रवाशांना मूलभूत सुविधा –

अनिल परब (Anil Parab) म्हणाले, फार हायफाय नाही, मात्र, राज्यातील प्रत्येक एसटी स्टॅंडवर (ST stand) प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी, प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी व्यवस्था आणि स्वछतागृह या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक डेपोला सूचना केल्या असून त्यांचे काम देखील सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने –

पुढे परब (Anil Parab) म्हणाले, खासदार छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजातील विविध संघटना यांच्याबरोबर सरकार सातत्याने संवाद साधत आहे. मराठा आरक्षणाच्या बाजूने सरकार आणि शिवसेनेची देखील सकारात्मक भूमिका आहे. तसेच, अन्य सर्व समाजच्या न्याय, हक्काच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : anil parab | then pune mumbai and other municipal elections will be held time anil parabs

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित