Advt.

Anil Parab | अनिल परबांचं मोठे विधान; म्हणाले – ‘एसटी कामगारांना 4 वेळा संधी दिली, त्यामुळे आता…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी महामंडळाचे (ST Corporation) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण (Merger) करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून संपावर (ST Workers Strike) आहेत. राज्य सरकारने (State Government) एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करुन त्यांना कामावर येण्याचे आवाहन केले होते. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मोठे विधान (Big Statement) केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 4 वेळा संधी देऊनही ते कामावर आले नसल्याने त्यांच्यावरील कारवाई मागे घेणार नसल्याचे अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले.

अनिल परब हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कारवाई संदर्भात मोठे विधान केले. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना 2 नाही तर 4 वेळा कामावर हजर राहण्याची आणि कारवाई मागे घेण्याची संधी दिली. मात्र, यानंतरही ते कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे आता या कामगारांवरील कारवाई मागे घेतली जाणार नसल्याचे परब (Anil Parab) यांनी सांगितले. तसेच आता कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावं त्यानंतर कोणाशीही बोलणी करायला सरकार तयार असल्याचे परब यांनी सांगितले.

आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चालले आहे

ज्या एसटी कामगारांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे ती माघारी घेतली जाणार नाही. दिवाळीच्या अगोदर पासून आतापर्यंत सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या 50 गटांना भेटी दिल्या आहेत. 28 युनियनच्या कृती समितीबरोबर करारही केला आणि बाकीच्या मागण्या मान्य केल्या. यानंतरही ते आंदोलन (ST Workers Agitation) मागे घेत नाहीत याचा अर्थ एसटी कामगारांचे आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चालले असल्याचे परब यांनी सांगितले.

सदावर्तेंनी रीतसर पोलीस संरक्षण मागावं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या जीवाला धोका या हवेतल्या गोष्टी आहेत.
त्यांच्या जीवाला जर धोका असेल, तर त्यांनी रीतसर पोलीस संरक्षण (Police Protection) मागावं.
शासन त्यांना संरक्षण देईल.
कोणाच्याही जीवाला धोका करण्याची इच्छा नाहीये, असेही परब यांनी यावेळी नमूद केलं.

Web Title : Anil Parab | transport minister anil parab big statement on protesting MSRTC bus employee

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे