Anil Parab | अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही 99% मतांनी जिंकू – अनिल परब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Andheri By Election) पार्श्वभूमीवर शिवसेना Shivsena (उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उमेदवार दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासंदर्भात अनिल परब (Anil Parab) बोलले होते.

 

या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तयार आहे. अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके यांची अपूर्ण राहिलेली कामे आता ऋतुजा लटके यांच्या मार्फत पूर्ण होणार आहेत. मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाच्या दिवशी येऊन ऋतुजा लटके यांना मते देऊन विजयी करावे. विरोधकांकडून लोकांना पैसे देऊन नोटावर मत देण्यास सांगितले जात आहे. त्याविरोधात आम्ही पोलिसांत आणि निवडणूक आयोगात (State Election Commission) तक्रार केली आहे. नोटा हा मतदाराचा अधिकार आहे. पण निवडणूक प्रचारात नोटाचा प्रचार केला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही संबंधितांची तक्रार केली आहे. रिपाईचे (RPI) लोक असा प्रचार करत आहेत. ते योग्य नाही. आमच्याकडे त्यांच्याविरोधात काही पुरावे आणि टिप्स आल्या आहेत, असे परब म्हणाले.

 

अंधेरी हा एक महत्वाचा भाग आहे. कारण पूर्व मुंबईच्या उपनगरांना पश्चिम उपनगरांसोबत जोडण्याचे काम अंधेरी करत आहे.
अंधेरीत मोठ्या प्रमाणात व्यावसायित कार्यालये आहेत.
त्यामुळे येथील रस्ते आणि अन्य सुविधांची प्रलंबित कामे आम्ही पुढील दोन वर्षांत पूर्ण करणार आहोत.
अंधेरीत पाण्याची देखील मोठी समस्या होती. त्यावर आम्हाला काम करायचे आहे, असे परब म्हणाले.

अंधेरीची पोटनिवडणूक आम्हाला लढायची आहे, असे सांगून शिंदे गटाने निवडणूक आयोगात धाव घेतली होती.
त्यानंतर आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविले.
पण, शिंदे यांच्या गटाने कोणताही उमेदवार दिला नाही आणि भाजपने त्यांचा उमेदवार मागे घेतला.
शिंदे यांच्या गटाला ही निवडणूक लढवायची नव्हती. त्यांना फक्त ठाकरे गटाला आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता.
त्यांनी शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठविण्यासाठी केवळ हा बनाव केला होता, असे परब यावेळी म्हणाले.

 

Web Title :- Anil Parab | We will win Andheri by-election with 99% votes – Anil Parab

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून हिरेजडीत सोन्याची अंगठी लंपास

Gayatri Datar | गायत्री दातारचं टेलिव्हिजनवर कमबॅक; ‘या’ मालिकेतुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’