Homeताज्या बातम्यावरिष्ठ पोलीस निरीक्षकावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने माजी आमदार 'गोत्यात'

वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने माजी आमदार ‘गोत्यात’

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्य़रत असणाऱ्या अधिकाऱ्याची बदनामी केल्याप्रकरणी माजी आमदार अनिल रामकिसन राठोड (रा. खजुरगल्ली, अहमदनगर) यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय परमार यांनी फिर्य़ाद दिली आहे.अनिल राठोड याने वरिष्ठ पोलीस अधिकारी अक्षय शिंदे आणि अजय परमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. शिंदे आणि परमार हे समोरच्या पार्टीकडून पैसे घेतल्यानेच त्यांच्याकडून कामात हालगर्जीपणा झाला. त्यामुळेच त्यांची हाकालपट्टी झाली असल्याचे वक्तव्य राठोड याने केले होते. याची बातमी छापून आली आहे.

अनिल राठोड याच्यावर तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला असून त्याने कारवाई होऊ नये तसेच ही कारवाई थाबवावी यासाठी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर खोटे आरोप केले आहेत. पोलिसांवर खोटे आरोप करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे परमार यांनी दिलेल्या फिर्यादेत म्हटले आहे. परमार यांनी दिलेल्या फिर्यादेवरुन अनिल राठोड याच्या विरुद्ध दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर पोलीस करीत आहेत.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News