Anita Anand | भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी वर्णी 

पोलीसनामा ऑनलाइन  – Anita Anand | कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या अनिता आनंद (Anita Anand) यांची संरक्षण मंत्रीपदी  वर्णी लागली आहे. भारतीय वंशाच्या व्यक्तीला इतकी मोठी जबाबदारी देण्याची हि पहिलीच घटना नाही. यापूर्वीही   भारतीय वंशाचे हरजीत सज्जन हे संरक्षण मंत्री होते. अनिता आनंद यांचा भर लष्करातील प्रमुख सुधारणांवर असेल असं म्हटलं जात आहे.

संरक्षण खाते हरजीत सज्जन यांच्याकडे होते त्यावेळी त्यांच्यावर  लष्करातील व्यभिचाराची प्रकरणे हाताळण्यात अपयश आल्याचे आरोप करण्यात आले होते.

त्यामुळे हरजीत सज्जन यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, अनिता (Anita Anand) यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांच्यापुढे लष्करातील या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

नोवा स्कोटिया येथे १९६७ मध्ये अनिता यांचा जन्म झाला. त्यांचे आई- वडील भारतीय असून दोघेही वैद्यकीय क्षेत्रात आहेत. अनिता  एस व्ही आनंद हे तामिळनाडूचे असून आई सरोज या पंजाबच्या आहेत.
टोरांटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक म्हणून अनिता यांनी काम केलं आहे.
२०१९ मध्ये ओकविले इथून त्यांनी खासदारकीची निवडणूक लढली होती.
त्याचबरोबर त्यांनी मंत्रीपदही सांभाळले होते.

हे देखील वाचा

Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! प्रवासादरम्यान जर झाली ‘ही’ चूक, तर 3 वर्षासाठी जेलसह भरावा लागेल ‘दंड’

Maharashtra Covid Vaccination | महाराष्ट्राने केला विक्रम; 3 कोटी लोकांचे पूर्ण लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anita Anand | indian origin anita anand appointed as canada new defence minister pm trudeau reshuffle cabinet marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update